31 जानेवारीला चंद्र लाल, चंद्रग्रहण; अवकाशात अद्भूत दृश्य

बहुतांश चंद्रग्रहणं ही खंडग्रास स्वरुपाची असतात. पण 31 जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण आहे. भारतात हे चंद्रग्रहण अर्धच दिसणार आहे.

31 जानेवारीला चंद्र लाल, चंद्रग्रहण; अवकाशात अद्भूत दृश्य

मुंबई : खगोलप्रेमींसाठी 2018 वर्षातील जानेवारी महिना पर्वणीचा आहे. कारण या महिन्यात दिसणारा चंद्र नेहमीप्रमाणे नसेल. खगोलप्रेमींना सुपरब्लू, ब्लू मूनसह चंद्रग्रहण आणि लाल चंद्रही पाहायला मिळणार आहे. खगोलीय भाषेत याला 'ब्लड मून' म्हटलं जातं.

31 जानेवारी रोजी चंद्र लाल रंगाचा असेल. पण याचवेळी खग्रास चंद्रग्रहण असा 20 वर्षात एकदा येणारा दुर्मिळ योगही आहे. पृथ्वीच्या कक्षेतून फिरताना चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ पोहोचलेला असतो आणि त्याचवेळी चंद्रग्रहण झालं तर लाल चंद्राचा योग जुळून येतो. खगोल शास्त्रज्ञांनी याला 'स्नो ब्लू सुपर रायझिंग, कॉपर टोटल लुनार एक्लिप्स' असं नाव दिलं आहे.

बहुतांश चंद्रग्रहणं ही खंडग्रास स्वरुपाची असतात. पण 31 जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण आहे. भारतात हे चंद्रग्रहण अर्धच दिसणार आहे. सकाळी 6.20 वाजता चंद्र ग्रहणाला सुरुवात होईल. तर 9.30 वाजता ग्रहण पूर्णपणे सुटेल. खग्रास चंद्रग्रहण फक्त पॅसिफिक महासागरातून दिसणार आहे.

नववर्षाची सुरुवात 'सुपरमून'ने, तर महिन्याचा शेवट 'ब्लू मून'ने

चंद्र लाल का?
एरव्ही आपल्याला सूर्याच्या प्रकाशाने चकाकणारा चंद्र दिसतो. पण 31 जानेवारीला तो लालसर दिसणार आहे. सूर्याची किरणं पृथ्वीद्वारे अडवली गेल्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडेल. पण त्या सावलीच्या बाजूला पडणाऱ्या किरणं संधीप्रकाशित होऊन चंद्रावर पडणार असल्याने पृथ्वीवरुन चंद्र लाल दिसणार आहे.

ब्लू मून म्हणजे काय?
ब्लू मून म्हणजे चंद्र निळा असा विचार करत असाल तर तसं काही नाही. जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात, या घटनेला 'ब्लू मून' म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये 'वन्स इन अ ब्लू मून' (Once in a blue moon) अशी म्हण आहे. ‘ब्लू मून’ ही संकल्पना एखाद्या दुर्मिळ घटनेसाठी वापरली जाते.एकाच महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येण्याचा योग अतिशय दुर्मिळ असतो. त्यामुळे वैज्ञानिकांनी याला 'ब्लू मून' असं नाव दिलं आहे.

सुपरमून म्हणजे काय?
चंद्र पृथ्वीच्या जवळ पोहोचलेला असताना आलेल्या पौर्णिमेला सुपरमून असं संबोधतात. याचाच अर्थ चंद्र नेहमीपेक्षा 14 टक्के मोठा आणि 30 टक्के जास्त चमकदार दिसणार आहे. 2018 वर्षाचा पहिलाच दिवस म्हणजेच 1 जानेवारी रोजी सुपरमून पाहायला मिळाला होता.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Super Blue Blood, Moon Eclipse occurring on January 31
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV