कमल हसनची सेकंड इनिंग, राजकीय पक्ष स्थापन करणार

अॅपच्या माध्यमातून आपल्या पक्षाला पाठिंबा देण्याचं आवाहन तो चाहत्यांना करणार आहे.

कमल हसनची सेकंड इनिंग, राजकीय पक्ष स्थापन करणार

चेन्नई : चेन्नईच्या राजकारणात अभिनेता कमल हसनमुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. एम.जी. रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललिता यांच्यानंतर आता कमल हसन राजकारणात प्रवेश करणार आहे. शिवाय लोकवर्गणीतून तो स्वतःचा पक्ष काढणार आहे.

चेन्नईतल्या एका कार्यक्रमात कमल हसननं यासंदर्भात घोषणा केली आहे. उद्या म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी कमल हसनचा वाढदिवस आहे. यानिमित्तानं तो एक मोबाइल अॅप लाँच करणार आहे. अॅपच्या माध्यमातून आपल्या पक्षाला पाठिंबा देण्याचं आवाहन तो चाहत्यांना करणार आहे.

'कमल हसनसारख्यांना भर चौकात गोळी मारुन फासावर लटकवा'


नव्या पक्षाच्या बांधणीसाठी किमान 30 कोटी रुपयांची गरज लागेल, असं कमल हसननं म्हटलं. मी हा पैसा स्विस बँकेत ठेवणार नाही, तर स्विस बँकेतला पैसा परत आणेन, असा टोलाही त्याने लगावला.

नव्या पक्षाचं नाव काय असेल किंवा त्याचं स्वरुप कसं असेल, याबाबत हसननं अद्याप काहीही सांगितलेलं नाही.

दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध दर्शवत तसंच, हिंदू दहशतवादाचा उल्लेख करत त्यांनी आपल्या राजकारणाची दिशाही स्पष्ट केली आहे.

संबंधित बातम्या

‘हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद बोकाळतोय’, कमल हसनचा वादग्रस्त लेख

वादग्रस्त लेखाप्रकरणी अभिनेता कमल हसन विरोधात जनहित याचिका दाखल

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Superstar Kamal Hassan confirms launching new political party latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV