टाटांच्या 'ताज'चा ई-लिलाव होणार

By: | Last Updated: > Thursday, 20 April 2017 2:17 PM
टाटांच्या 'ताज'चा ई-लिलाव होणार

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील उच्चभ्रू अशा मानसिंग मार्गावरील 11 मजली अलिशान पंचतारांकित ‘ताज मानसिंग’ हॉटेलच्या ई-लिलावाला सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदिल दाखवला आहे.

जर लिलावात टाटा ग्रुपला यश मिळत नसेल, तर त्यांना हॉटेल रिकामं करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी द्यावा, असे सुप्रीम कोर्टाने नवी दिल्ली महानगरपालिकेला (एनडीएमसी) सांगितले आहे. याआधी एनडीएमसीने ‘ताज मानसिंग’च्या ई-लिलावाबाबत सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली होती.

सुप्रीम कोर्टाने टाटा ग्रुपच्या इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडला (IHCL) सांगितलं आहे की, जर तुम्हाला यसंदर्भात काहीही आक्षेप असेल, तर एका आठवड्यात उत्तर दाखल करा. याच वर्षी 12 जानेवारीला सुप्रीम कोर्टाने एनडीएमसीला टाटा ग्रुपचं लीज न वाढवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे सूचवले होते.

एनडीएमसीने या प्रकरणी योग्य कारवई न केल्याचा ठपकाही ठेवला आणि कायदेशीर अधिकाऱ्यांचं मत उजेडात आणलं नाही, ज्यामध्ये टाटा ग्रुपला लीज वाढवण्यास सांगितले होते.

एनडीएमसीने सहा महिन्यात निर्णय घ्यावा आणि कोर्टात त्यासंदर्भातील अहवाल सादर करावा. मात्र, हॉटेलच्या लिलावादरम्यान टाटा ग्रुपलाच पहिलं प्राधान्य द्यावं. मात्र, जर ते लिलावत ठरवेली रक्कम देऊ शकले नाहीत, तर जी मोठी बोली लागेल, त्यांना लीज द्यावं, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

याआधी टाटा ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने लिलावाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ती याचिका 27 ऑक्टोबरला दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आणि नवी दिल्ली महानगरपालिकेला हॉटेलच्या लिलावाला हिरवा कंदिल दाखवला. मात्र, टाटा ग्रुपने सुप्रीम कोर्टात दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले होते. मात्र, आता सुप्रीम कोर्टानेही एनडीएमसीच्या बाजूने निर्णय दिला आहे.

टाटा ग्रुपचं ‘ताज मानसिंग’ हे हॉटेल 1976 मध्ये आयएचसीएलला 33 वर्षांसाठी लीजवर दिले होते. मूळ संपत्ती ही एनडीएमसीच्या मालकीची आहे. मात्र,  2011 मध्ये लीज संपल्यानंतरही टाटा ग्रुपने वेगवेगळ्या आधारावर लीजचा विस्तार करुन व्यावसाय सुरु ठेवला.

First Published:

Related Stories

पंतप्रधान मोदींकडून आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा
पंतप्रधान मोदींकडून आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 33 व्या ‘मन की

काँग्रेस नेते शंकर सिंह वाघेलांचे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत
काँग्रेस नेते शंकर सिंह वाघेलांचे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे...

गांधीनगर : गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

अल्पसंख्यांकांवरील जुन्या वक्तव्यावरुन ओवेसींचं कोविंद यांच्यावर टीकास्त्र
अल्पसंख्यांकांवरील जुन्या वक्तव्यावरुन ओवेसींचं कोविंद...

हैदराबाद : अल्पसंख्याकासंदर्भातील जुन्या वक्तव्यावरुन एमआयएमचे

काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद
काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक, दोन जवान शहीद
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक, दोन जवान शहीद

सुकमा (छत्तीसगड) : सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरातील

पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्यासोबतच्या पहिल्याच भेटीत इतिहास रचणार!
पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्यासोबतच्या पहिल्याच भेटीत इतिहास...

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 आणि 26 जून रोजी अमेरिका दौऱ्यावर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017 1.    राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांचं

भारतात घुसखोरी करणाऱ्या पाक सैनिकांकडे शस्त्रास्त्रांसह खास सापळे
भारतात घुसखोरी करणाऱ्या पाक सैनिकांकडे शस्त्रास्त्रांसह खास...

जम्मू : पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (BAT) नियंत्रण

21 'आप' आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार
21 'आप' आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या मोठा झटका बसला आहे. कारण त्यांच्या 21

पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना
पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 4 दिवसीय परदेश