अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर तलवार दाम्पत्य भावूक

अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाअगोदर, जेलमध्ये असलेलं तलवार दाम्पत्य तणावाखाली दिसून आलं. आरुषी-हेमराज हत्याकांड प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता केली आहे.

By: | Last Updated: > Thursday, 12 October 2017 3:47 PM
Talwar couple get emotional after Allahabad high court verdict

अलाहाबाद : नोएडामधील आरुषी-हेमराज हत्याकांड प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणातून तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालानंतर तलवार दाम्पत्य भावूक झालं.

तलवार दाम्पत्य सध्या राजेश आणि नुपूर तलवार हे गाझियाबादमधील डासना तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना स्वतःचीच मुलगी आरुषी आणि घरातील नोकर हेमराजच्या मृत्यूप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात तलवार दाम्पत्याने अलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली होती.

जेलमधील सूत्रांनुसार, तलवार दाम्पत्याला रात्रभर झोप लागली नाही. त्यांनी सकाळपासून साधा नाष्टाही केलेला नाही. सकाळी तपासणी केल्यानंतर त्यांचा रक्तदाबही वाढलेला दिसून आला, असं बोललं जात आहे. तलावर दाम्पत्याने तुरुंगातील इतर कैद्यांशी नेहमीप्रमाणे गप्पाही मारल्या नाही, असंही काही वृत्तांमध्ये म्हटलं आहे.

तलवार दाम्पत्याला अलाहाबाद हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. या निर्णायनंतर तलावर दाम्पत्य भावूक झालं.

काय आहे नेमकं प्रकरण?

2008 साली आरुषी हत्याकांडानं संपूर्ण देश हादरुन गेला होता. 16 मे 2008 या दिवशी नोएडातील जलवायू विहार परिसरातून 14 वर्षीय आरुषीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. त्याच्याच पुढच्या दिवशी छतावरुन तलावर कुटुंबीयातील नोकर हेमराज याचाही मृतदेह सापडला होता.

या दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी आरुषिचे वडील राजेश तलवार यांना अटक केली होती. 29 मे 2008 साली तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. त्यानंतर सीबीआयनं चौकशी करुन तलवार दाम्पत्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

या खटल्यातील सर्व सुनावणीनंतर कोर्टानं 26 नोव्हेंबर 2013 साली नुपूर आणि राजेश तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या शिक्षेविरुद्ध तलवार दाम्पत्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.

आरुषी हत्याकांडाचा घटनाक्रम

  1. चौदाव्या वाढदिवसाच्या एकदिवस आधी म्हणजे 16 मे 2008 रोजी आरुषी नोएडामधील तिच्या घरातील बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळली. याशिवायत्यांचा नोकर हेमराज बेपत्ता असल्याने त्याला संशयित घोषित करण्यात आलं. पण त्यानंतर इमारतीच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह आढळला.
  2. आरुषीच्याहत्येनंतर सातव्या दिवशीम्हणजेच 23 मे रोजी तिचे वडील राजेश तलवार यांना दुहेरी हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांची जामीनावर सुटका झाली.
  3. हे प्रकरण 31 मेरोजी नोएडा पोलिसांकडूनसीबीआयकडे सोपवण्यात आलं. आरुषीला नोकर हेमराजसोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यामुळे राजेश तलवार यांनी आपल्या मुलीची हत्या केली, असं पोलिसांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
  4. अल्पवयीनमुलांबाबत पोलिसांनीसार्वजनिक केलेले आरोप अजिबात स्वीकारले जाणार नाहीत, असं नॅशनल कमिशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ चिड्रेनराईट्स अर्थात एनसीपीसीआरने म्हटलं होतं.
  5. जूनमहिन्यात हेमराजचे तीनमित्र जे तलवार कुटुंबात काम करत होते त्यांना अटक करण्यात आली. आरुषी आणि हेमराज यांची हत्येतील संशयित म्हणून सीबीआयने या तिघांचीही चौकशी केली.
  6. त्यांच्याविरोधात कोणतेहीपुरावे न सापडल्याने सीबीआयने तीन महिन्यांनंतर त्यांची मुक्तता केली.
  7. कोर्टात हजर न राहण्याच्याआदेशांकडे दुर्लक्ष केल्याने एप्रिल 2012मध्ये नुपूर तलावर यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पाच महिन्यांनी म्हणजेच सप्टेंबरमध्ये त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.
  8. डिसेंबर 2012मध्ये सीबीआयने हेप्रकरण बंद करण्याची परवानगी मागितली. राजेश तलवार मुख्य संशयित असले तरी त्यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याचं सीबीआयने कोर्टात सांगितलं.
  9. हेमराज आणि आरुषीचा गळाअशाप्रकारे घोटण्यात आला आहे की, वैद्यकीय तज्ज्ञच असं करु शकतात. याशिवाय राजेश तलवार यांचा गोल्फ क्लब घरातच आढळून आला, त्याचा उपयोग दोघांना मारण्यासाठी केला असावा, असं सीबीआयने कोर्टात सांगितलं होतं.
  10. 12 ऑक्टोबर 2017 रोजी तलवार दाम्पत्याची प्रकरणातून निर्दोष मुक्तता

संबंधित बातमी : आरुषी हत्याकांडातून तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Talwar couple get emotional after Allahabad high court verdict
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

वाढत्या प्रदुषणामुळं 25 लाख भारतीयांचा मृत्यू!
वाढत्या प्रदुषणामुळं 25 लाख भारतीयांचा मृत्यू!

नवी दिल्ली : संपूर्ण देशात 2015 मध्ये जल, वायू आणि इतर प्रकारच्य़ा

देशाचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांचा राजीनामा
देशाचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांचा राजीनामा

नवी दिल्ली : देशाचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी आपल्या पदाचा

‘दाऊदच्या संपत्तीच्या लिलावात त्याच्याच हस्तकांची घुसखोरी’
‘दाऊदच्या संपत्तीच्या लिलावात त्याच्याच हस्तकांची घुसखोरी’

मुंबई : भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम भोवतीचा फास घट्ट

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न

पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशात, जवानांसोबत दिवाळी साजरी
पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशात, जवानांसोबत दिवाळी साजरी

जम्मू काश्मीर : पंतप्रधान झाल्यापासून सीमेवर दिवाळी साजरी

फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा IAS अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप
फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा IAS अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप

कोलकाता : मुंबईत राहणाऱ्या महिलेने एका आयएएस अधिकाऱ्याविरोधात

हरियाणात 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून हत्या
हरियाणात 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून हत्या

पानिपत : हरियाणातील पानिपतमध्ये 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून

सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं अनैतिक : दारुल उलूम देवबंद
सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं अनैतिक : दारुल उलूम देवबंद

  सहारनपूर (उत्तर प्रदेश) : मुस्लिम पुरुष आणि महिलांनी सोशल

जीएसटी, नोटाबंदीमुळं कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिवाळी गिफ्ट्सला कात्री
जीएसटी, नोटाबंदीमुळं कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिवाळी गिफ्ट्सला...

मुंबई : दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गिफ्टमध्ये

माफ करा, मी नोटाबंदीचं समर्थन केलं होतं : कमल हसन
माफ करा, मी नोटाबंदीचं समर्थन केलं होतं : कमल हसन

तामिळनाडू : मोदी सरकारच्या नोटाबंदीची स्तुती करणाऱ्या अभिनेता कमल