बसमधून कबुतराचा प्रवास, तिकीट न काढल्याने कंडक्टरला मेमो

बस आणि ट्रेनमधून अनेक प्रवासी विनीतिकीट प्रवास करतात. पण तामिळनाडूमध्ये एका कबुतराने बसमधून विनातिकीट प्रवास केल्याने कंडक्टरला मेमो मिळाला आहे. तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने हा मेमो बजावला आहे.

By: | Last Updated: 10 Sep 2017 11:16 AM
बसमधून कबुतराचा प्रवास, तिकीट न काढल्याने कंडक्टरला मेमो

चेन्नई : बस आणि ट्रेनमधून अनेक प्रवासी विनीतिकीट प्रवास करतात. पण तामिळनाडूमध्ये एका कबुतराने बसमधून विनातिकीट प्रवास केल्याने कंडक्टरला मेमो मिळाला आहे. तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने हा मेमो बजावला आहे.

गुरुवारी रात्री उशीरा एक प्रवासी आपल्या कबुतरासोबत हारुर ते इल्लावाडी बसने प्रवास करत होता. यावेळी बसमध्ये एकूण 80 प्रवासी होते. ही बस हारुरमध्ये दाखल होताच, तिकीट पर्यवेक्षक अधिकाऱ्याने बसमध्ये एन्ट्री घेऊन, प्रवाशांकडील तिकीट तपासण्यास सुरुवात केली.

यावेळी एका प्रवाशाकडे कबूतर असल्याचे पाहून पर्यवेक्षकाने याचे तिकीट काढलंय का? अशी विचारणा संबंधित प्रवाशाला केली. प्रवाशाने पर्यवेक्षकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावर पर्यवेक्षकाने कंडक्टरला जाब विचारला. पण कंडक्टरकडून समाधानकारक उत्तर मिळालं नसल्यानं, त्याला मेमो देण्यात आला.

यावेळी पर्यवेक्षकाने एका नियमाचा हवाला देऊन सांगितलं की, बसमध्ये प्राणी आणि पक्षांसाठीही तिकीट अनिवार्य आहे. पण हा नियम एखादा प्रवासी 30 पेक्षा जास्त प्राणी अथवा पक्षांना घेऊन प्रवास करत असल्याचं लागू होतो. एका कबुतरासाठी हा नियम लागू होत नसल्याचं, महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV