तब्बल 49 वस्तूंवरील टॅक्समध्ये कपात, जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत निर्णय

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी काऊन्सिलने छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देत हॅण्डीक्राफ्टच्या 29 वस्तूंवरील कर पूर्णपणे माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याशिवाय जवळजवळ 49 इतर वस्तूंवरील कर कमी करण्यात आला आहे.

तब्बल 49 वस्तूंवरील टॅक्समध्ये कपात, जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत निर्णय

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी काऊन्सिलने छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देत हॅण्डीक्राफ्टच्या 29 वस्तूंवरील कर पूर्णपणे माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याशिवाय जवळजवळ 49 इतर वस्तूंवरील कर कमी करण्यात आला आहे.

एकूण 78 वस्तूंबाबत या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत निर्णय झाला. जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीनंतर उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रकाश पंत यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.

पण संपूर्ण देश ज्या गोष्टीची वाट पाहत आहे ती खुशखबर अद्यापही मिळालेली नाही. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये अजूनही समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय या बैठकीत रियल इस्टेट अर्थात बांधकाम व्यवसायही जीएसटीच्या अखत्यारित आणण्याची  कोणतीच चर्चा झाली नाही. या बैठकीआधी बांधकाम व्यवसायही जीएसटीच्या अखत्यारित आणण्याबाबत बरीच चर्चा सुरु होती.

याशिवाय जीएसटीच्या फायलिंगमध्ये देखील व्यापाऱ्यांना अद्याप कोणती सूट देण्यात आलेली नाही.  दरम्यान, या बैठकीआधी अशीही चर्चा होती की, कृषी उपकरणं, इलेक्ट्रिक वाहने, ऑनलाईन सेवा यावरील जीएसटीचे दर कमी केले जातील.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: tax has been reduced on around 49 items after GST council meeting latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV