नितीश कुमारांचा अंतरात्मा पंतप्रधान मोदींमध्ये आहे का? : तेजस्वी यादव

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंतरात्म्याचा आवाज ऐकून राजीनामा देत असल्याचं नितीश कुमार यांनी म्हणाले. यावरुन नितीश कुमार यांचा अंतरात्मा पंतप्रधान मोदी आहेत का? असा सवाल तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला आहे.

नितीश कुमारांचा अंतरात्मा पंतप्रधान मोदींमध्ये आहे का? : तेजस्वी यादव

पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंतरात्म्याचा आवाज ऐकून राजीनामा देत असल्याचं नितीश कुमार यांनी म्हणाले. यावरुन नितीश कुमार यांचा अंतरात्मा पंतप्रधान मोदी आहेत का? असा सवाल तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे, ''पनामा पेपर्स प्रकरणात छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्याच्या मुलाचं नाव आहे. त्याशिवाय अमिताभ बच्चन, अदानीचे मोठ्या भावाचंही नाव आहे. तर मग याप्रकरणी नितीश यांचा अंतरात्मा का जागा होत नाही,'' असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना विचारला.

तेजस्वी यादव म्हणाले की, ''बिहारचे मुख्यमंत्री सध्या अंतरात्म्याची भाषा करत आहेत. पण नितीश कुमार आपला सोईनुसार अंतरात्मा जागा करतात. मी त्यांना विचारु इच्छितो की, त्यांची अंतरात्मा खुर्चीमध्ये आहे, की भितीमध्ये की मोदींमध्ये?'' या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं.

बिहारच्या नव्या मंत्रिमंडळावर आक्षेप घेताना तेजस्वी यादव म्हणाले की, ''एका नव्या सर्वेक्षणानुसार, नव्या मंत्रिमंडळातील 75 टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. मुख्यमंत्र्यांपासून ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांवर गुन्हे दाखल आहेत. जे आरोप माझ्यावर आहेत, तेच आरोप विद्यमान उपमुख्यमंत्र्यांवरही आहेत. तर मग नितीश कुमारांना त्यांच्यासोबत काम करताना शांती कशी मिळते?'' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यात वाद झाल्यानंतर आता बिहारमधील राजकारण चांगलंच तापलंय. कालच आरजेडी अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीही पत्रकार परिषद घेऊन नितीश कुमारांवर टीकेची झोड उठवली होती. नितीश कुमार सत्तेचे भुकेले असल्याची टीका त्यांनी काल केली होती.

संबंधित बातम्या

नितीश कुमार सत्तेचे भुकेले, लालूप्रसाद यादव यांचं टीकास्त्र

बिहारमध्ये आणखी एक भूकंप, जेडीयूमध्ये फूट?

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV