अँबी व्हॅलीच्या लिलावाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

सर्वोच्च न्यायालयानं अँबी व्हॅलीच्या लिलावाला स्थगिती देण्याची विनंती फेटाळली आहे. त्यामुळं सुब्रतो रॉय यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, सुब्रतो रॉय जेव्हा सेबीकडे दीड हजार कोटींची रक्कम जमा करतील. तेव्हाच अँबी व्हॅलीच्या लिलावाला स्थगिती देण्यात येईल, असं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

By: | Last Updated: > Thursday, 10 August 2017 11:50 PM
The Supreme Court declined Subrata Roy’s petition to stay the global auction of Aamby Valley

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयानं अँबी व्हॅलीच्या लिलावाला स्थगिती देण्याची विनंती फेटाळली आहे. त्यामुळं सुब्रतो रॉय यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, सुब्रतो रॉय जेव्हा सेबीकडे दीड हजार कोटींची रक्कम जमा करतील. तेव्हाच अँबी व्हॅलीच्या लिलावाला स्थगिती देण्यात येईल, असं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

लोणावळ्यातील अँबी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रिया थांबण्यात यावी, यासाठी सहारा समुहानं काल बुधवार 9 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्ययालयाला पुन्हा विनंती केली होती. यावेळी सहारा समुहानं गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात येतील, असं आश्वासनही सर्वोच्च न्यायालयाला दिलं होतं.

पण आज झालेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं सहारा समुहाची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच जोपर्यंत दीड हजार कोटींची रक्कम जमा होत नाही. तोपर्यंत लिलावाला स्थगिती देण्यात येणार नाही, असं स्पष्ट शब्दात सुनावलं आहे. तसेच अँबी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे, आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत.

दरम्यान, सहारा समुहाच्या वतीनं कपिल सिब्बल आणि मुकुल रोहतगी या दिग्गज वकिलांनी बाजू मांडली. मात्र, सुप्रीम कोर्टानं सहारा वकिलांच्या युक्तीवादाला नकार देत, स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे कोर्टाच्या दणक्यानंतर अँबी व्हॅली सहारा समुहाच्या हातून जाणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या

‘अँबी व्हॅली’ स्वतःकडे राखण्यासाठी ‘सहारा’ समुहाची धडपड

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:The Supreme Court declined Subrata Roy’s petition to stay the global auction of Aamby Valley
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

राजधानी एक्स्प्रेसवर आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा
राजधानी एक्स्प्रेसवर आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा

नवी दिल्ली : सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या राजधानी

'लष्कर-ए-तोयबा'चा कमांडर अयुब लेलहारीला कंठस्नान
'लष्कर-ए-तोयबा'चा कमांडर अयुब लेलहारीला कंठस्नान

नवी दिल्ली : भारतीय सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी

हिजबुल मुजाहिद्दीन अमेरिकेकडून दहशतवादी संघटना घोषित
हिजबुल मुजाहिद्दीन अमेरिकेकडून दहशतवादी संघटना घोषित

नवी दिल्ली : काश्मिर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिजबुल

5 रुपयात नाश्ता, 10 रुपयात जेवण.. बंगळुरुत ‘इंदिरा कॅन्टीन’ सुरु
5 रुपयात नाश्ता, 10 रुपयात जेवण.. बंगळुरुत ‘इंदिरा कॅन्टीन’ सुरु

बंगळुरु : कामगार आणि गरिबांना स्वस्तात जेवण मिळावं यासाठी बंगळुरूत

स्वातंत्र्यदिनाचं माझं भाषण प्रसारित केलं नाही, त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप
स्वातंत्र्यदिनाचं माझं भाषण प्रसारित केलं नाही, त्रिपुराच्या...

अगरताळा : स्वातंत्र्यदिनानिमित्तानं केलेलं भाषण दूरदर्शन आणि

मित्रांची बाईक रेस, हेल्मेटला कॅमेरा, भिंतीला धडकून जीव गेला!
मित्रांची बाईक रेस, हेल्मेटला कॅमेरा, भिंतीला धडकून जीव गेला!

नवी दिल्ली: दिल्लीत मित्रांसोबत लावलेली बाईक रेस एका तरुणाच्या आणि

'लव्ह जिहाद' प्रकरणाचा तपास NIA ने करावा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
'लव्ह जिहाद' प्रकरणाचा तपास NIA ने करावा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने केरळमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणाचा

'रोहित वेमुला दलित नव्हता, नैराश्येतून त्याची आत्महत्या'
'रोहित वेमुला दलित नव्हता, नैराश्येतून त्याची आत्महत्या'

नवी दिल्ली: हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला दलित

श्रीनगरच्या लाल चौकात महिलेकडून 'भारत माता की जय'चे नारे
श्रीनगरच्या लाल चौकात महिलेकडून 'भारत माता की जय'चे नारे

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या लाल चौकात एका महिलेने ‘भारत माता की

बिहारमध्ये पुराचं थैमान, 56 जणांचा मृत्यू, 70 लाख नागरिकांना फटका
बिहारमध्ये पुराचं थैमान, 56 जणांचा मृत्यू, 70 लाख नागरिकांना फटका

पाटणा: बिहारमध्ये आलेल्या महापुराने आतापर्यंत 56 जणांचा बळी घेतला