मोदींच्या सोशल मीडियावर किती खर्च? पीएमओचं उत्तर

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Friday, 17 March 2017 8:59 PM
मोदींच्या सोशल मीडियावर किती खर्च? पीएमओचं उत्तर

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांनी माहिती अधिकाराअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया मॅनेजमेंटवर किती खर्च होतो, याची माहिती मागवली. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी सोशल मीडियावर किती खर्च केला, याची माहिती मागवण्यासाठी सिसोदियांनी अर्ज केला होता.

पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडियावर आतापर्यंत एक रुपयाही खर्च आलेला नाही, असं उत्तर पंतप्रधान कार्यालय म्हणजेच पीएमओने दिलं आहे.

पंतप्रधानांचं ‘पीएमओ इंडिया’ हे मोबाईल अॅप एका स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी विकसीत केलं आहे. त्यामुळे या अॅपवर विद्यार्थ्यांच्या सत्काराला जे पैसे लागले, त्याव्यतिरिक्त कोणताही खर्च आला नाही, असं पीएमओने म्हटलं आहे.

पीएमओ अॅप पीएमओ कार्यालयाकडून ऑपरेट केलं जातं. त्यामुळे वेगळ्या यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाचीही आवश्यकता नाही. शिवाय www.pmindia.gov.in ही पंतप्रधान कार्यालयाची वेबसाईटही पीएमओकडूनच ऑपरेट केली जाते, यावरही खर्च येत नाही, असं पीएमओने म्हटलं आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या सोशल मीडियाचं व्यवस्थापनही पीएमओकडूनच केलं जातं. त्यामुळे यासाठीही कोणता वेगळा खर्च येत नाही. शिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदींकडून कोणतंही अभियान चालवण्यात आलं नाही, असंही पीएमओने उत्तरात म्हटलं आहे.

First Published: Friday, 17 March 2017 8:59 PM

Related Stories

पाटण्यात स्टेज कोसळल्याने लालू प्रसाद यादव जखमी
पाटण्यात स्टेज कोसळल्याने लालू प्रसाद यादव जखमी

पाटणा : पाटणामध्ये पुन्हा एकदा प्रचंड गर्दीमुळे स्टेज कोसळल्याची

मोबाईल कनेक्शनसाठी आता ई-केवायसी बंधनकारक
मोबाईल कनेक्शनसाठी आता ई-केवायसी बंधनकारक

मुंबई : नवीन मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी आता आधारकार्ड सक्तीचं होणार

उद्धव ठाकरेंना मोदींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण
उद्धव ठाकरेंना मोदींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण

नवी दिल्ली : शिवसेना सातत्याने करत असलेला विरोध टाळण्यासाठी आता

विजय मल्ल्यांना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, प्रत्यार्पणाला मंजुरी
विजय मल्ल्यांना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, प्रत्यार्पणाला...

मुंबई : सरकारी बँकांचं कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्या यांच्या

सेबीचा रिलायन्स इंडस्ट्रीजला दणका, एक हजार कोटींचा दंड
सेबीचा रिलायन्स इंडस्ट्रीजला दणका, एक हजार कोटींचा दंड

नवी दिल्ली : सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने

मान्सूनवर अल निनोचा प्रभाव होणार नाही: हवामान खातं
मान्सूनवर अल निनोचा प्रभाव होणार नाही: हवामान खातं

मुंबई: भारतातल्या मान्सूनची अल निनोच्या कचाट्यातून सुटका झाल्याची

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/03/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/03/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/03/2017   पाच दिवसांनी डॉक्टरांचा संप

केंद्र सरकारकडून सूर्यफूल बियांच्या आयात शुल्कामध्ये 20 टक्के कपात
केंद्र सरकारकडून सूर्यफूल बियांच्या आयात शुल्कामध्ये 20 टक्के कपात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सूर्यफूलाच्या बियांचे आयात शुल्क 30

बाराव्या वर्षी पितृत्व, भारतातील सर्वात तरुण पित्यावर गुन्हा
बाराव्या वर्षी पितृत्व, भारतातील सर्वात तरुण पित्यावर गुन्हा

कोची : केरळमधील कोचीमध्ये राहणारा 12 वर्षांचा चिमुरडा बाप झाला आहे. 17

लोकप्रतिनिधींनी पटकन हिंसक होणं अयोग्य : एकनाथ शिंदे
लोकप्रतिनिधींनी पटकन हिंसक होणं अयोग्य : एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण करणारे