मोदी सरकारने बनवलेल्या रस्त्यांवर 200 वर्ष खड्डे पडणार नाहीत : गडकरी

There will not be potholes on road for 200 years, claims Nitin Gadkari

अलाहाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासकामांच्या निमित्ताने उत्तर प्रदेशच्या अखिलेश यादव सरकारवर निशाणा साधला आहे. यूपी सरकार विकासाऐवजी जातीचं राजकारण करते. तर मोदी सरकार असे रस्ते बनवत आहेत, ज्यावर 200 वर्षांपर्यंत खड्डे पडणार नाहीत, असं नितीन गडकरी म्हणाले.

 

अलाहाबादमधील एका कार्यक्रमात नितीन गडकर बोलत होते. “मोदी सरकार जे रस्ते बनवत आहेत, त्यावर कधीही खड्डे पडणार नाहीत. कारण या रस्त्यांच्या बांधकामात लाचखोरी होत नाही. यूपीला देशातील अव्वल क्रमांकाच राज्य बनवण्याची मोदी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे विकासकामांना प्राधान्य दिलं जात आहे,” असं नितीन गडकरी म्हणाले.

 

“विकासाच्या बाबतीत उत्तर प्रदेश फारच मागासलेला आहे. त्यामुळे या राज्यावर विशेष लक्ष दिलं जात आहे,” असंही गडकरींनी नमूद केलं.

 

दरम्यान यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अलहाबादला अनेक भेटी दिल्या. अलाहाबादसाठी 317.91 कोटी रुपयांच्या तीन योजना जाहीर केल्या. वाराणसीपासून हल्दियापर्यंत जलमार्गाचा विस्तार अलाहाबादपर्यंत करण्याची मोठी घोषणाही गडकरी यांनी केली. या जलमार्गासाठी चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

 

नितीन गडकरी म्हणाले की, “केंद्र सरकार देशात सिमेंट आणि काँक्रिटच्या नव्या पद्धतीने असे रस्ते बनवणार आहे, ज्यावर 200 वर्ष खड्डे पडणार नाहीत.” गडकरींनी यावेळी अलाहाबाद प्रतापगड एनएच 96चं चौपदरीकरण, अलाहाबादपासून मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत एनएच 27 चं रुंदीकरणाचं भूमीपूजन केलं.  41.719 किमी लांबीच्या या हायवेला 774.57 कोटी रुपये खर्च येणार आहे.”

 

यासोबतच फाफामऊमध्ये गंगा नदीवर सहापदरी पुलाचं भूमीपूजनही गडकरी यांनी केलं. या पुलासाठी 1800 कोटींचा निधी निश्चत केला आहे.

 

नितीन गडकरींनी अलाहाबादपासून जौनपूर मार्गे गोरखपूर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. या महामार्गाच्या विकासासाठी 170 कोटींचा निधी जाहीर केला आहे.

 

तर झूंसीकडे गंगा नदीवर आठ पदरी पूल बनवण्यासही नितीन गडकरींनी मंजुरी दिली आहे. तसंच गडकरींनी 2019 मध्ये अलाहाबादमध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्याआधीच सर्व काम पूर्ण करण्याची घोषणा केली.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:There will not be potholes on road for 200 years, claims Nitin Gadkari
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

संसदेचं हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान - सूत्र
संसदेचं हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान - सूत्र

नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन लांबल्याने विरोधकांची मोदी

भाजपचे वादग्रस्त खासदार साक्षी महाराजांचं नाव मतदार यादीतून गायब
भाजपचे वादग्रस्त खासदार साक्षी महाराजांचं नाव मतदार यादीतून गायब

लखनऊ :  नेहमीच वेगवेगळ्या वक्तव्यांनी नवा वाद निर्माण करणाऱ्या

आकाशातून शत्रूला टिपण्याची भारताची ताकद आणखी वाढली
आकाशातून शत्रूला टिपण्याची भारताची ताकद आणखी वाढली

  नवी दिल्ली : आकाशातून शत्रूला टिपण्याची भारताची ताकद अनेक पटींनी

तुमच्या बारवाल्यापेक्षा आमचा चहावाला चांगला : परेश रावल
तुमच्या बारवाल्यापेक्षा आमचा चहावाला चांगला : परेश रावल

मुंबई : अभिनेता आणि भाजप खासदार परेश रावल यांनी काँग्रेसवर निशाणा

जीएसटीनंतर सरकार आता आयकर व्यवस्थेत बदल करणार!
जीएसटीनंतर सरकार आता आयकर व्यवस्थेत बदल करणार!

नवी दिल्ली : अप्रत्यक्ष कर व्यवस्थेत बदल केल्यानंतर मोदी सरकार आता

...म्हणून शिक्षकांना उघड्यावर शौच करणाऱ्यांच्या फोटोग्राफीची ड्यूटी
...म्हणून शिक्षकांना उघड्यावर शौच करणाऱ्यांच्या फोटोग्राफीची...

पटना : ‘हगणदारीमुक्त गावा’साठी बिहारमधील काही जिल्ह्यातील

केंद्रीय मंत्र्यामुळे विमानाला उशीर, महिला प्रवाशाने मंत्रीमहोदयांना झापलं
केंद्रीय मंत्र्यामुळे विमानाला उशीर, महिला प्रवाशाने...

इंफाळ : व्हीव्हीआयपींमुळे विमानाला उशीर झाल्याचं तुम्हीही अनेकदा

गुजरातमध्ये मोदींवर बांगड्या फेकणाऱ्या महिलेला काँग्रेसचं तिकीट?
गुजरातमध्ये मोदींवर बांगड्या फेकणाऱ्या महिलेला काँग्रेसचं तिकीट?

अहमदाबाद : गेल्या महिन्यात बडोद्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी

सेन्सॉर बोर्ड : ए टू झेड माहिती
सेन्सॉर बोर्ड : ए टू झेड माहिती

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून सेंटर बोर्ड ऑफ फिल्म

मराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत यांना गूगलचा सलाम
मराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत यांना गूगलचा सलाम

मुंबई : डूडलच्या माध्यमातून महान व्यक्ती, महत्त्वाच्या घटना