जयंती विशेष : डॉ. अब्दुल कलाम यांचं 'हे' स्वप्न अधुरंच राहिलं!

देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं पायलट बनण्याचं स्वप्न होतं. मात्र या स्वप्नाच्या जवळ पोहोचूनही त्यांचं ते स्वप्न अधुरंच राहिलं.

जयंती विशेष : डॉ. अब्दुल कलाम यांचं 'हे' स्वप्न अधुरंच राहिलं!

नवी दिल्ली : भारताचा ‘मिसालईल मॅन’ अशी ओळख असणारे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचं पायलट बनण्याचं स्वप्न होतं... आणि ते त्यांच्या या स्वप्नाच्या जवळ पोहोचलेही होते. मात्र, इंडियन एअरफोर्समध्ये आठ जागा रिक्त होत्या. मात्र, मुलाखतीत कलाम यांचा नववा क्रमांक होता. त्यामुळे कलाम यांना पायलट होणं शक्य झालं नाही.

डॉ. कलाम यांनी याबाबत त्यांच्या “My Journey: Transforming Dreams into Actions” या पुस्तकात लिहिलं आहे.

मद्रास टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना डॉ. कलाम यांचं भविष्यात पायलट होण्याचं स्वप्न होतं. “माझं स्वप्न होतं की, अवकाशात उंच उडावं आणि तिथून मशिन कंट्रोल करावी.”, असे डॉ. कलाम यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.

डॉ. कलाम यांनी एअरफोर्समध्ये पायलट होण्याच्या दृष्टीने प्रयत्नही केलेले. त्यासाठी त्यांना दोन ठिकाणांहून मुलाखतीची निमंत्रणं आली. पहिलं निमंत्रण होतं देहरादूनच्या इंडियन एअरफोर्सकडून, तर दुसरं निमंत्रण होतं दिल्लीतील संरक्षण मंत्रालयाच्या तंत्रज्ञान आणि उत्पादन संचालनालयाकडून..

कलाम यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, संरक्षण खात्याला मुलाखत देणं शक्य होतं. मात्र, संरक्षण मंत्रालय उमेदवारांकडून काही विशेष गुणांची अपेक्षा करत होता. तिथे 25 मुलांची निवड झाली होती. या 25 मुलांमध्ये डॉ. कलाम नवव्या स्थानावर होते आणि संरक्षण खात्याकडे केवळ 8 जागा रिक्त होत्या.

“एअरफोर्सचं पायलट बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात मी अपयशी ठरलो. त्यानंतर मी ऋषिकेशला जाऊन नव्या दिशेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.”, असे डॉ. अब्दुल कलाम त्यांच्या पुस्तकात लिहितात.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग, किस्से, शिक्षण आणि प्रेरणादायी अनुवभव मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातमी : जयंती विशेष : पेपर टाकणारा मुलगा ते देशाचा राष्ट्रपती, डॉ. कलाम यांचा प्रेरणादायी प्रवास

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV