लग्न कधी करणार? विजेंदरच्या प्रश्नाला राहुल गांधींचं उत्तर

जपानमध्ये खेळल्या जाणाऱ्या आईकिदो नावाच्या खेळात ब्लॅक बेल्ट मिळवल्याचं राहुल गांधींनी सांगितलं.

लग्न कधी करणार? विजेंदरच्या प्रश्नाला राहुल गांधींचं उत्तर

नवी दिल्ली : सध्या गुजरातच्या राजकीय आखाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दोन हात करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मार्शल आर्ट्समध्येही पारंगत आहेत. आईकिदो नावाच्या जपानी खेळात राहुल गांधींनी ब्लॅक बेल्ट पटकावल आहे.

नवी दिल्लीत पार पडलेल्या पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात बॉक्सर विजेंदर सिंगनं राजकीय नेते खेळांमध्ये का रस दाखवत नाही असा सवाल विचारला, यावर उत्तर देताना राहुल गांधींनी एक गुपित उघड केलं.

जपानमध्ये खेळल्या जाणाऱ्या आईकिदो नावाच्या खेळात ब्लॅक बेल्ट मिळवल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. मी जाहीररित्या कुठल्याही खेळाबद्दल बोलत नसलो, तरी क्रीडा हा माझ्या आयुष्यात महत्त्वाचा भाग आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

विजेंदर सिंग फक्त राहल गांधींच्या खेळाच्या आवडी-निवडी विचारुन थांबला नाही. संपूर्ण देशाला सतावणारा प्रश्न राहुल गांधींना विचारण्याचं धाडसही त्यानं दाखवलं.

'मी आणि माझी बायको नेहमी म्हणतो की राहुल भैया कधी लग्न करणार? तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर लग्न करण्याची मजाच वेगळी असेल', असं विजेंदर म्हणाला. या प्रश्नाला मात्र राहुल यांनी बगल दिली. 'हा खूप जुना प्रश्न आहे. मी नशिबावर विश्वास ठेवतो. जेव्हा होईल तेव्हा होईल.' असं राहुल गांधी म्हणाले.भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: This is how Rahul Gandhi responds to boxer Vijender Singh’s question on marriage latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV