काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, मसूद अझहरच्या पुतण्याचाही खात्मा

काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले आहेत.

काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, मसूद अझहरच्या पुतण्याचाही खात्मा

जम्मू-काश्मीर : काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले आहेत. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. ही चकमक अद्याप सुरुच असल्याचे वृत्त आहे.

यामध्ये जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहरचा पुतण्या 'तल्हा रशीद' ठार झाला आहे. त्यामुळे हे सुरक्षा दलाचं मोठं यश मानलं जात आहे.

दक्षिण काश्मीरमधील अलगर कंडीमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर जोरदार शोध मोहीम सुरु करण्यात आली. यावेळी अचानक दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. यात जवानांनी तीन दहशतवाद्यांना टिपलं.
या हल्ल्यात एक नागरिक दहशतवाद्यांची गोळी लागून जखमी झाला आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Three terrorists killed in encounter in Jammu Kashmir latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV