अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अबू इस्माईलचा खात्मा

पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबाचा अतिरेकी अबू इस्माईल आणि त्याच्या साथीदाराला नौगाममध्ये ठार मारण्यात आलं

By: | Last Updated: 14 Sep 2017 05:57 PM
अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अबू इस्माईलचा खात्मा

श्रीनगर : अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर ए तोयबाचा प्रमुख दहशतवादी अबू इस्माईलला कंठस्नान घालण्यात आलं आहे. श्रीनगरजवळ नौगाममध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांशी झालेल्या चकमकीत अबूसह त्याच्या साथीदाराचा खात्मा करण्यात आला.

'पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबाचा अतिरेकी अबू इस्माईल आणि त्याच्या साथीदाराला नौगाममध्ये ठार मारण्यात आलं. सुरक्षा दल आणि पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे.' असं जम्मू आणि काश्मिर पोलिस अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आलं. अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा अबू इस्माईल सूत्रधार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी गराडा घातला आणि चकमकीत दोघांचा खात्मा केला. अबू इस्माईलसोबत पाकिस्तानचा रहिवासी असलेला छोटा कासिम ठार झाला. दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

अमरनाथ यात्रेच्या बसवर झालेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सहा महिलांचा समावेश होता. तर 19 जण जखमी झाले होते.

अबू इस्माईल हा गेल्या वर्षभरात खात्मा झालेला चौथा कुख्यात दहशतवादी आहे. बुरहान वाणी, सब्जर भाट, अबू दुजाना यांना गेल्या वर्षभरात कंठस्नान घालण्यात आलं होतं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV