देशात यंदा कृषी उत्पादनात 80 टक्क्यांनी वाढ!

By: | Last Updated: > Tuesday, 9 May 2017 9:02 PM
देशात यंदा कृषी उत्पादनात 80 टक्क्यांनी वाढ!

फाईल फोटो

नवी दिल्ली : देशभरात मान्सून चांगला राहिल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृषी उत्पादनात 80 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. चालू वर्षी गहू, तांदूळ आणि डाळींच्या उत्पादनात एकूण 27 कोटी 33 लाख 80 हजार इतकी विक्रमी उत्पादन राहण्याची शक्यता कृषी मंत्रालयाच्या तिसऱ्या सुधारीत अंदाज पत्रकातून व्यक्त करण्यात आली आहे.

कृषी मंत्रालयाने आपल्या तिसऱ्या सुधारीत अंदाज पत्रकात अन्न-धान्याचं उत्पादन किती राहिल याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, जुलै 2016 ते जून 2017 महिन्यापर्यंत तांदळाचं 10 कोटी 91 लाख टन उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच गव्हाचं 9 कोटी 74 लाख टन आणि डाळींचं उत्पादन 2 कोटी 24 लाख राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

कृषी विभाग उत्पादनाची अंतिम आकडेवारी सादर करण्यापूर्वी सर्व हंगामाच्या उत्पादनाची आकडेवारी सादर करतं. त्यानुसार यंदा रब्बी हंगामातील पिकांची कापणी सध्या जोरात सुरु असल्याचं यात म्हटलं आहे.

तिसऱ्या सुधारित अंदाजानुसार, अन्न-धान्याचं एकूण उत्पादन 27 कोटी 33 लाख टन इतकं होण्याचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या वर्षी देशात 25 कोटी 15 लाख टन उत्पादन झालं होतं. तर त्यापूर्वी 2013-14 मध्ये 26 कोटी 50 लाख टन विक्रमी उत्पादन झालं होतं.

अन्नधान्यांमध्ये तांदूळ, गहू आणि डाळींच्या पिकांचा समावेश आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात, 2016 या वर्षात पर्जन्यमान चांगले राहिल्याने, तसंच सरकारद्वारे राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे देशात पिकांचं विक्रमी कृषी उत्पादन होत असल्याचं म्हणलं आहे.

First Published:

Related Stories

''मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज''
''मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज''

पुणे : राज्यात मान्सून वेगाने दाखल होईल. 2, 3 आणि 4 जून रोजी पावसाची

ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

नवी दिल्ली : दोन वर्षानंतर ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ झाली आहे. आज

एफआरपी म्हणजे काय?
एफआरपी म्हणजे काय?

मुंबई : सारखरेच्या दरासंदर्भात सर्रास कानावर पडणारा शब्द म्हणजे

तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण
तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण

सांगली : तूर, मोसंबी, मिरची आणि आता हळदीच्या उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ

खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार
खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार

अकोला : येत्या खरीप हंगामासाठी ‘महाराष्ट्र राज्य बियाणे

शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी ताब्यात
शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी...

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर
शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर

नाशिक: नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातल्या एका

मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत
मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत

नवी दिल्ली : यवतमाळच्या ज्या दाभडी गावात तीन वर्षांपूर्वी

मान्सून 30 मे रोजी केरळात!
मान्सून 30 मे रोजी केरळात!

पुणे : मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान

अल निनो न्यूट्रल, यंदा मान्सूनवर परिणाम नाही!
अल निनो न्यूट्रल, यंदा मान्सूनवर परिणाम नाही!

वॉशिंग्टन : भारतात यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार नाही,