व्हायरल सत्य : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या 'या' फोटोमागचं सत्य काय?

ज्या बाईकस्वारासमोर पोलिस अधिकारी शलभ कुमारांनी हात जोडले आहेत, त्याचं नाव हनुमंत नायडू आहे.

By: | Last Updated: > Wednesday, 11 October 2017 7:27 AM
Truth behind viral photo of police officer and biker latest updates

मुंबई : आंध्र प्रदेशातील एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत बाईकवर एक व्यक्ती दोन महिला आणि दोन मुलांसोबत बसली आहे. तर समोर एक पोलिस अधिकारी या बाईकस्वारासमोर हात जोडून उभा आहे.

आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील ही घटना आहे.

या फोटोतील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, बाईकवर बसलेल्या कुणीच हेल्मेट घातले नाही.

कर्नाटक कॅडरचे आयपीएस अधिकारी अभिषेक गोयल यांनी हा फोटो ट्विटरवर पोस्ट करत लिहिले आहे की, “बाईकस्वारासमोर हात जोडण्यापलिकडे पोलिस अधिकारी काय करु शकतो?”

अभिषेक गोयल यांचं हे ट्वीट 7 हजारांहून अधिक जणांनी लाईक आणि 4 हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे.

बाईकस्वारासमोर हात जोडून असणाऱ्या या पोलिस अधिकाऱ्याचं नाव शलभ कुमार असल्याची माहिती मिळते आहे. शलभ कुमार हे अनंतपूरच्या मडाकसारियामध्ये पोलिस अधिकारी आहेत.

आणखी विशेष म्हणजे, या घटनेआधी काही तास रोड सेफ्टीसंदर्भात एक कार्यक्रम पोलिस अधिकारी शलभ कुमार यांनी केला होती. त्या कार्यक्रमात हे कुटुंबही हजर होते.

ज्या बाईकस्वारासमोर पोलिस अधिकारी शलभ कुमारांनी हात जोडले आहेत, त्याचं नाव हनुमंत नायडू आहे.

शलभ कुमार यासंदर्भात बोलताना म्हणाले, “जेव्हा मी बाईकवर पाच जण बसल्याचे पाहिले, त्यावेळी मला प्रचंड राग आला. मात्र मी हतबल झालो आणि त्यांच्यासमोर केवळ हात जोडले. कारण मी तेच करु शकत होतो.”

पोलिस अधिकारी शलभ कुमार यांनी बाईकस्वार हनुमंत नायडू यांच्यासमोर हात जोडले. त्यावेळी हनुमंत नायडू हे हसत होते.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Truth behind viral photo of police officer and biker latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मंत्र्यांच्या आधारकार्डची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडेच नाही!
मंत्र्यांच्या आधारकार्डची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडेच नाही!

मुंबई : देशातल्या सव्वाशे कोटी भारतीयांना आधारकार्ड अनिवार्य

फटाकेबंदीचा निषेध, सुप्रीम कोर्टासमोर रॉकेट सोडलं!
फटाकेबंदीचा निषेध, सुप्रीम कोर्टासमोर रॉकेट सोडलं!

नवी दिल्ली : दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर असलेल्या बंदीचा निषेध

‘ताजमहल भारतीय मजुरांनी उभारला, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आमचीच’
‘ताजमहल भारतीय मजुरांनी उभारला, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी...

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार संगीत सोम यांच्या

भाजपकडे सर्वाधिक संपत्ती, बसपाची मोठी भरारी, राष्ट्रवादीची किती?
भाजपकडे सर्वाधिक संपत्ती, बसपाची मोठी भरारी, राष्ट्रवादीची किती?

 नवी दिल्ली: देशातील राजकीय पक्षांची संपत्ती किती आणि त्यांच्या

ताजमहल वादावरुन आझम खान यांचंही वादग्रस्त विधान
ताजमहल वादावरुन आझम खान यांचंही वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहलबद्दल केलेल्या

90 टक्के IAS अधिकारी कामं करत नाहीत : केजरीवाल
90 टक्के IAS अधिकारी कामं करत नाहीत : केजरीवाल

नवी दिल्ली : 90 टक्के आयएएस अधिकारी कामचुकार आहेत. त्यांच्याकडून फक्त

अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या भात्यात शिया वक्फ बोर्डाचे चांदीचे बाण
अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या भात्यात शिया वक्फ...

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील योगी सरकार अयोध्येतील शरयू तिरी 100 फुटी

जामिनावर सुटलेल्या माय-लेकांनी विकासावर बोलू नये : पंतप्रधान मोदी
जामिनावर सुटलेल्या माय-लेकांनी विकासावर बोलू नये : पंतप्रधान मोदी

गांधीनगर : राहुल गांधींच्या ‘विकास पागल हो गया’ या टीकेला नरेंद्र

चार वर्षांनंतर तलवार दाम्पत्य तुरुंगातून बाहेर
चार वर्षांनंतर तलवार दाम्पत्य तुरुंगातून बाहेर

लखनौ : आरुषी-हेमराज हत्याकांडाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत

पुढच्या दिवाळीपर्यंत अयोध्येत राम मंदिर उभे राहिल, सुब्रमण्यम स्वामींना विश्वास
पुढच्या दिवाळीपर्यंत अयोध्येत राम मंदिर उभे राहिल, सुब्रमण्यम...

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी