43 लाखांच्या नव्या नोटांसह टीव्ही अभिनेता पोलिसांच्या ताब्यात

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Friday, 9 December 2016 8:17 AM
43 लाखांच्या नव्या नोटांसह टीव्ही अभिनेता पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली: सत्य घटनेवर आधारित टीव्ही मालिका क्राईम पेट्रोलमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता राहुल चेलानीला होशंगाबाद पोलिसांनी 43 लाख 60 हजारांच्या नव्या नोटांसह पकडलं आहे. राहुल नव्या नोटा घेऊन इटारसीवरुन होशंगाबादला येत होता.

 

राहुल टीव्ही मालिकेत काम करत असताना सोबतच रिअल इस्टेटचा व्यापारही करतो. राहुल अनेक मालिकांमध्ये कामं करतो. पोलिसांनी राहुलकडून 2 हजार आणि पाचशेच्या नव्या नोटांसह इनोव्हा कारही जप्त केली आहे. ज्या कारवरक ‘प्रेसिडंट अॅण्टी करप्शन सोसायटी’ अशी पाटी आहे.

 

कार जप्त करुन पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. ज्यामध्ये राहुल हा त्यांचा प्रमुख असल्याचं समजतं आहे. राहुल एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याचं काम करत होता.

 
हे पैसे आपलेच असल्याचा दावा राहुलनं केला आहे. जे आपण मालिका आणि आपल्या व्यवसायातून कमावले असल्याचा त्यानं दावा केला आहे. राहुलच्या मते, हे पैसे तो आपल्या होशंगाबादमध्ये राहणाऱ्या मामांकडे ठेवण्यासाठी घेऊन जात होता. पण एवढे पैसे एकाचवेळी राहुलकडे आले कुठून हा प्रश्न त्याला विचारण्यात येत आहे.

 

दरम्यान, पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करीत असून नव्या नोटा  जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच यासंबंधी पोलिसांनी आयकर विभागालाही माहिती दिली आहे.

 

 

First Published: Friday, 9 December 2016 8:15 AM

Related Stories

राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत उत्तम पर्याय : संजय राऊत
राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत उत्तम पर्याय : संजय राऊत

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव

अनैतिक संबंध उघड, विवाहितेचा प्रियकरासोबत गळफास
अनैतिक संबंध उघड, विवाहितेचा प्रियकरासोबत गळफास

बेळगाव : प्रियकरासोबतचे अनैतिक संबंध पतीला कळल्याने विवाहितेने

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी?

नवी दिल्ली : जुलैमधे राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.

हिंदू कि मुस्लीम जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याक कोण? : सुप्रीम कोर्ट
हिंदू कि मुस्लीम जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याक कोण? : सुप्रीम...

  नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याक कुणाला म्हणावं, असा

कपिल शर्मावर बंदी नाही, मग खा. गायकवाडांवर का?: खा. अडसूळ
कपिल शर्मावर बंदी नाही, मग खा. गायकवाडांवर का?: खा. अडसूळ

नवी दिल्ली: शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, स्कायमेटचा अंदाज
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, स्कायमेटचा अंदाज

मुंबई : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस राहिल, असा अंदाज स्कायमेट या

सरकारी योजनांसाठी आधार कार्डची सक्ती नको : सुप्रीम कोर्ट
सरकारी योजनांसाठी आधार कार्डची सक्ती नको : सुप्रीम कोर्ट

 नवी दिल्ली: सरकार सगळीकडे आधार कार्ड सक्तीचं करत असताना, सुप्रीम

केंद्र सरकारने 'पद्म'साठी धोनीसह दिग्गजांची नावं डावलली?
केंद्र सरकारने 'पद्म'साठी धोनीसह दिग्गजांची नावं डावलली?

नवी दिल्ली : ‘पद्म पुरस्कार 2017’ साठी ज्या नावांची शिफारस करण्यात

जयललितांच्या जागेसाठी पोटनिवडणूक, 82 उमेदवार मैदानात
जयललितांच्या जागेसाठी पोटनिवडणूक, 82 उमेदवार मैदानात

चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर

प्रत्यक्षदर्शी एअर होस्टेस खासदार रवींद्र गायकवाड यांच्या बाजूने
प्रत्यक्षदर्शी एअर होस्टेस खासदार रवींद्र गायकवाड यांच्या बाजूने

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेने मारल्यानंतर