आग्र्यात दोन ठिकाणी स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही

By: प्रशांत कदम, एबीपी माझा, आग्रा | Last Updated: Saturday, 18 March 2017 11:22 AM
आग्र्यात दोन ठिकाणी स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही

आग्रा : आग्र्यामध्ये दोन ठिकाणी स्फोट झाला आहे. कँट रेल्वे स्टेशनजवळ एक आणि दुसरा स्फोट एका घराजवळ झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या स्फोटामध्ये कुणीही जखमी झालं नसून बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विशेष म्हणजे आयसिस या दहशतवादी संघटनेने कालच एका पोस्टरद्वारे ताजमहल उडवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर काही तासात हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे.

आयसिसकडून ताजमहल उडवण्याची धमकी

इंटरनेटवर लिंक तयार करुन ती प्रसिद्ध करण्यात आली होती. ती आयसिसची धमकी असल्याचं सांगितलं जात आहे. तरीही पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून ताजमहलसह आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, असं अतिरिक्त पोलीस महासंचालक दलजीत चौधरी यांनी सांगितलं होतं.

‘ताज महोत्सव’ या वार्षिक कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर ही धमकी देण्यात आली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आयसिसने एक फोटो प्रसिद्ध करुन ताज महल आपला पुढील निशाणा असल्याची धमकी दिली आहे.

दरम्यान आयसिसच्या या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी आग्र्यात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. कोणत्याही प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालक दलजीत चौधरी यांनी सांगितलं.

संबंधित बातमी : आयसिसकडून ताजमहल उडवण्याची धमकी, सुरक्षा व्यवस्थेत वाढ

First Published: Saturday, 18 March 2017 10:33 AM

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/04/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/04/2017

सर्वात मोठ्या #हुंडाबदी परिषदेनंतर, आता #तूर प्रश्नी एबीपी माझाचं

जम्मू : कुपवाडाजवळ लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद
जम्मू : कुपवाडाजवळ लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद

जम्मू : जम्मू काश्मीरमधील कुपवाड्यात दहशतवाद्यांनी केलेल्या

राहुल गांधींच्या कथित इटालियन गर्लफ्रेण्डसोबत व्हायरल फोटोमागचं सत्य काय?
राहुल गांधींच्या कथित इटालियन गर्लफ्रेण्डसोबत व्हायरल फोटोमागचं...

नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे सोशल मीडियावर दोन

दिल्ली निवडणुकीत शिवसेनेच्या 56 पैकी 55 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त
दिल्ली निवडणुकीत शिवसेनेच्या 56 पैकी 55 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

नवी दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपने तिसऱ्यांदा झेंडा

कुलभूषण जाधवांची फाशीची शिक्षा रद्द करा, आईची पाककडे याचिका
कुलभूषण जाधवांची फाशीची शिक्षा रद्द करा, आईची पाककडे याचिका

नवी दिल्ली : पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द करावी यासाठी

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/04/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/04/2017

एबीपी माझाच्या हुंडाविरोधी परिषदेला भरघोस प्रतिसाद, राज्यभरातून

पाकिस्तानी समूहाकडून भारताच्या 10 शैक्षणिक संस्थांची वेबसाईट हॅक
पाकिस्तानी समूहाकडून भारताच्या 10 शैक्षणिक संस्थांची वेबसाईट हॅक

  नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठासह किमान 10 शैक्षणिक संस्थांच्या

अटक टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल नेत्याला वाचवणं डॉक्टरांना अंगलट
अटक टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल नेत्याला वाचवणं डॉक्टरांना अंगलट

नवी दिल्ली : तुरुंगवास टाळण्यासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल होणाऱ्या

आप, काँग्रेसचा धुव्वा, भाजपचा दिल्ली महापालिकेवर तिसऱ्यांदा झेंडा
आप, काँग्रेसचा धुव्वा, भाजपचा दिल्ली महापालिकेवर तिसऱ्यांदा झेंडा

नवी दिल्ली : भाजपने दिल्ली महापालिकेवर तिसऱ्यांदा झेंडा फडकावला

देशवासियांचा जीव इतका स्वस्त नाही, गंभीरचा निशाणा
देशवासियांचा जीव इतका स्वस्त नाही, गंभीरचा निशाणा

नवी दिल्ली : टीम इंडियाचा फलंदाज गौतम गंभीरची बॅट मैदानावर जशी