काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!

शोपिया जिल्ह्यातील अवनीरा गावात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यात चकमक झाली. भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला असल्याचीही माहिती आहे.

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्रातील एका जवानासह दोन जवान शहीद झाले आहेत. अकोल्यातील सुमेध गवईंना या चकमकीत वीरमरण आलं. तर तर कॅप्टनसह तीन जवानही या चकमकीत जखमी झाले आहेत.

शोपिया जिल्ह्यातील अवनीरा गावात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यात चकमक झाली. भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला असल्याचीही माहिती आहे.

गावात दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून शोधमोहिम राबवण्यात आली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी अचानक जवानांवर हल्ला केला. भारतीय जवानांनीही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. पण दहशतवाद्यांनी अंदाधुंदपणे केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले.

सुमेध गवई हे चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लोणाग्रा येथे त्यांचे आई-वडील, बहीण राहतात. त्यांचा लहान भाऊही लष्करात आहे. एक ऑगस्ट रोजीच त्यांचा वाढदिवस होता. लवकरच ते सुट्टीवर गावी येणार होते. या वृत्ताने अकोला जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV