प्रसिद्ध सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांच्यावर अज्ञाताचा हल्ला

अज्ञाताने सुदर्शन पटनायक यांच्या हातातील घड्याळ हिसकावण्याचा प्रयत्न केला.

प्रसिद्ध सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांच्यावर अज्ञाताचा हल्ला

भुवनेश्वर : प्रसिद्ध सँड आर्टिट सुदर्शन पटनायक यांच्यावर अज्ञात तरुणाने हल्ला केला. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी सायंकाळी ओदिशामधील पुरी जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सँड आर्ट फेस्टीव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला.

अज्ञाताने सुदर्शन पटनायक यांच्या हातातील घड्याळ हिसकावण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्यांच्यावर हल्लाही केला. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

''एक तरुण हात मिळवण्याच्या निमित्ताने गर्दीतून पुढे आला आणि त्याने घड्याळ हिसकावण्याचा प्रयत्न केला. हात सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने हल्ला केला. विद्यार्थी आणि मित्रांनी त्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो गर्दीत गायब झाला'', अशी माहिती सुदर्शन पटनायक यांनी दिली.

दरम्यान रुग्णालयात उपचार घेतले असून आता प्रकृती बरी असल्याची माहिती सुदर्शन पटनायक यांनी दिली.

https://twitter.com/sudarsansand/status/937547152938606592

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: unknown person attacked on Sand artist sudarshan pattnaik
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV