लता मंगेशकर-आशा भोसलेंकडून भाजपचं अभिनंदन

By: | Last Updated: > Saturday, 11 March 2017 1:36 PM
UP Assembly Election Result 2017 : Lata Mangeshkar, Aasha Bhosle congratulates BJP

मुंबई : देशातल्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सर्वात मोठ्या लढाईचा निकाल लागत आहेत. देशभरातल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. भाजपने उत्तर प्रदेशमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. या विजयावर गानकोकिळा लता मंगेशकर आणि दिग्गज गायिका आशा भोसले या भगिनींनी ट्विटरवरुन भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘नमस्कार. आदरणीय नरेंद्र मोदीजी, अमित शाहजी आणि भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना शानदार विजयाबद्दल खूप खूप शुभेच्छा.’ असं ट्वीट लता मंगेशकर यांनी केलं आहे. यापूर्वीही लता मंगेशकरांनी पंतप्रधान मोदींना अनेकवेळा पाठिंबा दर्शवला होता.

Lata Mangeshkar Tweet

दिग्गज गायिका आशा भोसले यांनीही भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला आहे. ‘भारतीय लोकशाहीचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत कोणाची सत्ता येणार, हे ओळखणं फारसं कठीण नाही’ असं ट्वीट आशा भोसले यांनी केलं आहे.

Asha Bhosale Tweet

उत्तर प्रदेशात भाजपच्या पारड्यात तीनशेच्या जवळपास जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस-सपाचा मेरु सत्तरच्या आसपास रोखण्यात भाजपला यश आलं आहे. मायावतींना पुरता धक्का बसला असून बसपला 20 पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत.

उत्तराखंडमध्येही भाजपने घवघवीत यश मिळवलं आहे. मणिपूर-गोव्यात काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळाली. पंजाबमध्ये मात्र काँग्रेसला एकहाती यश मिळालं आहे.

First Published:

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, बँका, कंपन्यांसह ब्रिटीश

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती?
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती?

मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा पगार

महिलांनी रेपच्या बदल्यात जवानांची गुप्तांगं कापली, आझम बरळले
महिलांनी रेपच्या बदल्यात जवानांची गुप्तांगं कापली, आझम बरळले

लखनऊ: वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या समाजवादी पक्षाचे

पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!
पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांवर आता पॅन कार्ड नंबर आधार

राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल
राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदासाठीच्या यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार

लेह-लडाखपर्यंत रेल्वेचं जाळं, सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग ठरणार
लेह-लडाखपर्यंत रेल्वेचं जाळं, सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग ठरणार

लेह : चीनपासून वाढता धोका पाहता मोदी सरकारने रेल्वेचं जाळं आता

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका
युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका

मुंबई : वॉनाक्रायच्या दहशतीच्या महिन्याभरानंतर नव्या पीटरॅप

पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत : मोदी
पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत : मोदी

हेग : पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत, असे म्हणत

जीएसटीनंतर वीज दर वाढणार नाहीत : पियुष गोयल
जीएसटीनंतर वीज दर वाढणार नाहीत : पियुष गोयल

नवी दिल्ली : जीएसटीनंतर वीज बिल वाढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून मोदींचं स्वागत
भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून...

अॅमस्टरडॅम : अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट