यूपीत 15 ऑगस्टला मदरशात तिरंगा आणि राष्ट्रगीत अनिवार्य

येत्या 15 ऑगस्टला उत्तर प्रदेशातील सर्व मदरशात तिरंगा फडकावणे आणि राष्ट्रगीत गाणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

यूपीत 15 ऑगस्टला मदरशात तिरंगा आणि राष्ट्रगीत अनिवार्य

लखनऊ: येत्या 15 ऑगस्टला उत्तर प्रदेशातील सर्व मदरशात तिरंगा फडकावणे आणि राष्ट्रगीत गाणं अनिवार्य करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षण परिषदेने सर्व मदरशांना याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.

इतकंच नाही तर या कार्यक्रमाचं व्हिडीओ शूटिंग आणि फोटोही काढण्याचे निर्देश दिले आहेत.

मदरसा शिक्षण परिषदेने पत्र जारी करुन, सर्व जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण अधिकाऱ्यांना हे आदेश दिले आहेत.

आदेश काय?

प्रत्येक मदरशात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करा. स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाचं व्हिडीओ शूटिंग करा, जेणेकरुन भविष्यात अशा कार्यक्रमांचं उदाहरण देता येईल.

https://twitter.com/ANINewsUP/status/895908544347635713

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV