पुढच्या वर्षी कर्नाटक, मध्य प्रदेशसह या 8 राज्यात निवडणुका

आता पुढच्या वर्षात होणाऱ्या 8 राज्यांच्या निवडणुकांवर सर्वांचं लक्ष असेल. कारण यामध्ये काँग्रेसची सत्ता असलेली तीन राज्य आहेत.

पुढच्या वर्षी कर्नाटक, मध्य प्रदेशसह या 8 राज्यात निवडणुका

मुंबई : भाजपने गुजरातची सत्ता राखत आणि हिमाचल प्रदेश काँग्रेसकडून हिसकावून घेत देशातील 19 व्या राज्यावर सत्ता मिळवली आहे. आता पुढच्या वर्षात होणाऱ्या 8 राज्यांच्या निवडणुकांवर सर्वांचं लक्ष असेल. कारण यामध्ये काँग्रेसची सत्ता असलेली तीन राज्य आहेत.

काँग्रेसमुक्त भाजपचा नारा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्येच सत्ता राखण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागली. मात्र आता पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील जनतेने दौलेल्या कौलाचा पुरेपूर वापर करेल.

पुढच्या वर्षी निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, मिझोराम, मेघालय,  नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे. यापैकी कर्नाटक, मिझोराम आणि मेघालयमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे ही तीन राज्य वाचवण्याचं आव्हान काँग्रेससमोर असेल.

दरम्यान भाजपलाही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील सत्ता राखण्याचं आव्हान असेल. 2018 मध्ये सर्वात अगोदर कर्नाटकची निवडणूक होईल, जिथे काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल. कर्नाटकपासूनच निवडणुकांना सुरुवात होईल.

2018 मध्ये निवडणुका होणारी राज्य

  1. राजस्थान

  2. मध्य प्रदेश

  3. छत्तीसगड

  4. कर्नाटक

  5. मिझोराम

  6. मेघालय,

  7. नागालँड

  8. त्रिपुरा

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: upcoming assembly elections in 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: upcoming elections निवडणुका
First Published:
LiveTV