LIVE UPDATE : हार्दिकच्या सौराष्ट्र कच्छमध्ये काँग्रेसची मुसंडी

सौराष्ट्र कच्छ निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATE

LIVE UPDATE : हार्दिकच्या सौराष्ट्र कच्छमध्ये काँग्रेसची मुसंडी

गांधीनगर : सौराष्ट्र-कच्छ निवडणूक 2017 निकाल आज जाहीर होत आहेत. 182 जागांच्या विधानसभेत भाजपने 100 हून अधिक जागांवर आघाडी मिळवत, सलग चौथ्यांदा सत्ता स्थापनेच्या दिशेने आगेकूच केली आहे. तर काँग्रेसनेही निवडणुकी कडवी झुंज दिली आहे.

परंतु या निवडणुकीत सौराष्ट्र-कच्छमधील गुजराती जनता कोणाला मत देणार याकडे लक्ष लागलं होतं. कारण सौराष्ट्र-कच्छमध्ये पाटीदार आणि हार्दिक पटेलचं प्राबल्य आहे. ह्याच सौराष्ट्रमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.

सौराष्ट्र-कच्छमधील 54 जागांपैकी 30 जागांवर काँग्रेसला यश मिळालं आहे. तर भाजपच्या खात्यात 24 जागा जमा झाल्या आहेत.

दरम्यान, आज सकाळी आठ वाजता गुजरात निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण 182 जागांसाठी गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला मतदान पार पडलं.

पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान झालं होतं, तर दुसऱ्या टप्प्यात 68.70 टक्के मतदान झालं. त्यामुळे गुजरातचं रण कोण जिंकणार? आपलं होमग्राऊंड पंतप्रधान नरेंद्र मोदी राखणार की मोदींचा बालेकिल्ला काँग्रेस भेदणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत.

एक्झिट पोलचा अंदाज काय?


गुजरातमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार सत्तेत येण्याचा अंदाज एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. एबीपी न्यूज-सीएसडीएसने आज सर्वात मोठा एक्झिट पोल जाहीर केला. गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल.

गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा असून 92 हा बहुमताचा आकडा आहे.

सौराष्ट्र-कच्छचा कौल कुणाला? (एकूण जागा 54)

सौराष्ट्र-कच्छमध्ये कोणाच्या खात्यात किती मतं?
सौराष्ट्र-कच्छच्या 54 जागांवर नजर टाकल्यास एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलनुसार भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे. इथे भाजपला 49 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 41 टक्के आणि इतरांना 10% टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे.

SAURASHTR_VOTE_SHARE

जागांमध्ये कोणी बाजी मारली?
सौराष्ट्र-कच्छच्या 54 जागांमध्येही भाजपची आघाडी पाहायला मिळत आहे. भाजपला 31-37 जागा, काँग्रेसला 16-22 जागा आणि इतरांच्या खात्यात 0-2 जागा येण्याची शक्यता आहे. जागांच्या सरासरीवर नजर टाकली तर भाजपला 34 जागा, काँग्रेसला 19 जागा आणि इतरांच्या खात्यात केवळ एक जागा येण्याचं भाकित एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवलं आहे.

SAURASHTRA_SEATS

सौराष्ट-कच्छमधील 2012 मधील पक्षीय बलाबल

SAURASHTRA_2012_SEATS

निकाल कुठे-कुठे पाहता येईल?

निकालाची प्रत्येक अपडेट तुम्हाला एबीपी माझाच्या वेबसाईटवरही मिळू शकेल. टीव्हीसोबतच तुमच्या स्मार्टफोनवर बातमी, फोटो आणि व्हिडिओ स्वरुपात तुम्हाला हा निकाल पाहता येईल. शिवाय देशातील सर्वात मोठं ऑनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म हॉटस्टारवरही एबीपी माझा पाहता येईल.

गुगल प्ले स्टोअरवरुन एबीपी लाईव्ह हे अॅप डाऊनलोड केल्यास तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली आणि पंजाबी या सहा भाषांमध्ये निकाल पाहता येईल. शिवाय #ABPResults या हॅशटॅगसह तुम्ही ट्वीटही करु शकता.

लाईव्ही टीव्ही - http://abpmajha.abplive.in/live-tv

मराठी वेबसाईट - http://abpmajha.abplive.in

सोशल मीडियावर निकाल कसा पाहाल?

फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर तुम्हाला हा निकाल लाईव्ह पाहता येईल. फेसबुकवर एबीपी माझाची लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही दिवसभर पाहू शकता. शिवाय ट्विटरवरही क्षणाक्षणाची अपडेट मिळेल.

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - @abpmajhatv

यूट्यूब - https://www.youtube.com/abpmajhalive

गुजरातचा रणसंग्राम : निकालाचा क्षणाक्षणाचा थरार कसा पाहाल?

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: URL: Saurashtra Kutch Gujarat assembly elections 2017 results live latest news, Elections Results News in marathi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV