सीरियावर अमेरिकेकडून हवाईहल्ले, ब्रिटन, फ्रान्सचा हल्ल्य़ाला पाठिंबा

सीरियातील रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिका आणि रशियामध्ये चांगलाच तणाव वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हवाईहल्ल्याचे आदेश दिले असून, त्याला फ्रान्स आणि ब्रिटेनने पाठिंबा दिला आहे.

सीरियावर अमेरिकेकडून हवाईहल्ले, ब्रिटन, फ्रान्सचा हल्ल्य़ाला पाठिंबा

वॉशिंग्टन : सीरियातील रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिका आणि रशियामध्ये चांगलाच तणाव वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हवाईहल्ल्याचे आदेश दिले असून, त्याला फ्रान्स आणि ब्रिटेनने पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे रशियाने तिन्ही देशांना युद्धाचा इशारा दिला आहे.

सीरिया प्रकरणावरुन देशाला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “सीरियाचा हुकूमशाह बशर अल असद यांच्या रासायनिक हल्ल्याचा लक्ष्य बनवून,  हल्ले सुरु करावेत, असे आदेश काहीच वेळापूर्वी आम्ही सैन्याला आदेश दिले आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “फ्रान्स आणि ब्रिटेनच्या मदतीने यासंदर्भात एक संयुक्त ऑपरेशन सीरियात सुरु आहे. यासाठी दोन्ही देशांचे मी आभार मानतो. हा हल्ला असद सरकारला सीरियामध्ये रशियाच्या रासायनिक शस्त्रास्त्रांच्या वापरास रोखण्यात अपयशी ठरल्याचा परिणाम आहे.”

सध्या सीरियातील पूर्वी गोता प्रांतातील डुमामध्ये रासायनिक शस्त्रास्त्रांच्या वापराने तणाव वाढला आहे. या हल्ल्यात लहान मुलांसह एकूण 74 जणांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यासाठी सीरियाच्या सरकारला दोषी ठरवलं होतं. तसेच, याविरोधात लष्करी कारवाईचा इशाराही दिला होता. त्याशिवाय, या हल्ल्याला अमेरिकेने रशियालाही दोषी धरलं होतं.

पण दुसरीकडे रशिया आणि सीरियाच्या बशर अल असद सरकारने याबाबतचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: us president donald trump says us france britain strikes on syria now underway
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV