उत्तराखंड सरकारची उधळपट्टी, 11 महिन्यात चहापानावर 68 लाख खर्च

केवळ 11 महिन्यांच्या कार्यकाळात सरकारने पाहुण्यांचं स्वागत आणि चहापानासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल 68 लाख खर्च केले आहेत. माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

By: | Last Updated: 06 Feb 2018 01:22 PM
उत्तराखंड सरकारची उधळपट्टी, 11 महिन्यात चहापानावर 68 लाख खर्च

देहरादून : उत्तराखंड सरकारकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरु आहे. कारण, केवळ 11 महिन्यांच्या कार्यकाळात सरकारने पाहुण्यांचं स्वागत आणि चहापानासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल 68 लाख खर्च केले आहेत. माहिती अधिकारात ही बाब समोर आली आहे.

उत्तराखंडमध्ये 18 मार्च 2017 रोजी भाजप सरकारने सत्ता स्थापन केली. यावेळी त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रं आपल्या हाती घेतली. पण पदभार स्विकारल्यानंतर सरकारने आत्तापर्यंत पाहुण्याच्या स्वागत आणि चहापानावर 68 लाख 59 हजार 865 रुपये खर्च केले आहेत.नैनीतालमध्ये राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत सिंह यांच्या अर्जाला उत्तर देताना राज्याच्या सचिवालय कार्यलायाने ही माहिती दिली. सरकारने खर्च केलेल्या पैशांचा हिशोब केल्यास दिवसाला तब्बल 22 हजार रुपये फक्त चहा पाण्यावर खर्च झाल्याचा दावा हेमंत सिंह यांनी केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केरळमधूनही असाच काहीचा प्रकार समोर आला होता. केरळच्या विधानसभा अध्यक्षांच्या नव्या चष्म्याचं बिल राज्य सरकारने भरलं होतं. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्षांच्या चष्म्याची किंमत तब्बल 50 हजार रुपये होती.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: uttarakhand government spend 68 lakhs on tea and snaks
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV