योगी आदित्यनाथ, मोदींचं चित्र काढल्यानं नववधूला पतीकडून मारहाण

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं चित्र काढल्यानं एका नववधूला तिच्या पतीनं बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

By: | Last Updated: 11 Sep 2017 01:45 PM
योगी आदित्यनाथ, मोदींचं चित्र काढल्यानं नववधूला पतीकडून मारहाण

लखनऊ : उत्तरप्रदेशमधील बलियामध्ये एका मुस्लिम महिलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचं चित्र काढणं फारच महागात पडलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच लग्न झालेल्या नववधूनं आपली आवड जोपासत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचं चित्रं काढलं. पण तिने काढलेल्या या चित्रामुळे तिचा पती भलताच भडकला आणि त्यानं थेट तिला मारहाण केली.

मोदी आणि योगींचं चित्र काढल्यानं या महिलेचा पती आणि इतर पाच जणांनी तिला बेदम मारहाण केली. त्यामुळे महिलेनं थेट पोलिसात धाव घेत पती आणि त्याच्या पाच नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पीडित महिलेच्या वडिलांच्या मते, 'आपली आवड जोपासण्याची तिला मोठी किंमत मोजावी लागली आहे. यामुळे तिला मारहाण तर झालीच पण सासरकडच्यांनी तिला घराबाहेरही काढलं आहे.'

याप्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV