व्यंकय्या नायडू यांना एनडीएतर्फे उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी

केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना एनडीएतर्फे उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी ते उपराष्ट्रपतीपदाचा अर्ज दाखल करतील.

Venkaiah Naidu elected as NDA’s vice presidential candidate latest update

नवी दिल्ली : केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना एनडीएतर्फे उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी ते उपराष्ट्रपतीपदाचा अर्ज दाखल करतील.

एखाद्या दक्षिण भारतीय चेहऱ्याला संधी देण्याची भाजपची रणनीती आहे. त्यामुळेच व्यंकय्या नायडू यांचं नाव जवळपास निश्चित समजलं जात होतं. एनडीएतर्फे उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि निर्मला सीतारमन यांची नावं चर्चेत असल्याचं म्हटलं जात होतं.

व्यंकय्या नायडू यांचा अल्प परिचय

व्यंकय्या नायडू हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. मोदी सरकारमध्ये नायडूंकडे नगरविकास मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांनी 2002 ते 2004 या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे.

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात नायडूंकडे ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी होती. दक्षिण भारतातील भाजपचे महत्वाचे नेते म्हणून व्यंकय्या नायडूंकडे पाहिलं जातं. नायडूंना 25 वर्षांपेक्षा जास्त काळाचा संसदीय कामकाजाचा अनुभव आहे.

यूपीएकडून गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी

काँग्रेसच्या नेतृत्वात यूपीएनेही उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे. विरोधी पक्षांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आता उपराष्ट्रपतीपदासाठी गोपालकृष्ण गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सत्ताधारी एनडीएने राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली आहे.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Venkaiah Naidu elected as NDA’s vice presidential candidate latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

गुजरातमध्ये काँग्रेसला भगदाड, तीन आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
गुजरातमध्ये काँग्रेसला भगदाड, तीन आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : गुजरातमध्ये काँग्रेसला भगदाड पडले आहे. बलवंत सिंह

अहमदाबादमध्ये ‘कोसळधार’, विमानतळावर पाणीच पाणी!
अहमदाबादमध्ये ‘कोसळधार’, विमानतळावर पाणीच पाणी!

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये गेल्या काही तासांपासून

व्हिडिओ : पासपार्टसाठी अर्ज करण्याच्या सोप्या टिप्स
व्हिडिओ : पासपार्टसाठी अर्ज करण्याच्या सोप्या टिप्स

पासपोर्टसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भराल? पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या

लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, जेडीयूला शिवसेनेपेक्षा जास्त मंत्रिपदं?
लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, जेडीयूला शिवसेनेपेक्षा...

नवी दिल्ली : बिहारमधील राजकीय भूकंपाने देशाच्या राजकारणालाही

केजरीवाल माझ्याशी खोटं बोलले, मी त्यांची केस लढणार नाही: जेठमलानी
केजरीवाल माझ्याशी खोटं बोलले, मी त्यांची केस लढणार नाही: जेठमलानी

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत

LIVE - नितीश कुमार यांचा शपथविधी
LIVE - नितीश कुमार यांचा शपथविधी

पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल (बुधवार) राजीनामा

तेजस्वी यादवांचा रात्री अडीच वाजता राजभवनावर मोर्चा
तेजस्वी यादवांचा रात्री अडीच वाजता राजभवनावर मोर्चा

पाटणा : मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल (बुधवार) मुख्यमंत्रीपदाचा

नितीश कुमार मुख्यमंत्री, सुशील मोदी उपमुख्यमंत्री
नितीश कुमार मुख्यमंत्री, सुशील मोदी उपमुख्यमंत्री

पाटणा: जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार हे सहाव्यांदा बिहारच्या

भाजपच्या पाठिंब्याने बिहारमध्ये पुन्हा नितीशराज
भाजपच्या पाठिंब्याने बिहारमध्ये पुन्हा नितीशराज

पाटणा : नितीश कुमार यांच्या नव्या सरकारचा आज शपथविधी होणार आहे.

राजीनामा ते सत्ताबदल, बिहारमधील मोदी-नितीश पर्वाचे 3 तास
राजीनामा ते सत्ताबदल, बिहारमधील मोदी-नितीश पर्वाचे 3 तास

पाटणा : बिहारमध्ये 3 तासांत राजकीय भूकंप घडला. नितीश कुमार,