अनुपम खेर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अभिनेता गजेंद्र चौहान यांना प्रतिष्ठित एफटीआयआयचे अध्यक्ष बनवलं होतं. परंतु विद्यार्थ्यांनी चौहान यांच्या नियुक्तीला तीव्र विरोध केला होता.

By: | Last Updated: > Wednesday, 11 October 2017 3:07 PM
Veteran actor Anupam Kher appointed as FTII chairperson

नवी दिल्ली : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. गजेंद्र चौहान यांच्या जागी अनुपम खेर यांची नियुक्ती झाली आहे.

फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था ही पुण्यात आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अभिनेता गजेंद्र चौहान यांना प्रतिष्ठित एफटीआयआयचे अध्यक्ष बनवलं होतं. परंतु विद्यार्थ्यांनी चौहान यांच्या नियुक्तीला तीव्र विरोध केला होता.

अनुपम खेर यांनी 1982 मध्ये ‘आगमन’ या चित्रपटातून सिने कारकीर्दीची सुरुवात केली होती. खेर यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं.
2004 मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

सरकार आणि मोदींचे आभार : किरण खेर
अनुपम खेर यांच्या पत्नी आणि भाजप खासदार किरण खेर यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. “मला अनुपम खेर यांचा अभिमान आहे. ते जबाबदारी योग्यरित्या निभावतील. मी सरकार आणि मोदींची आभारी आहे, अशा भावना किरण खेर यांनी व्यक्त केलं.  “पण कोणत्याही संस्थेचं अध्यक्षपद हे काटेरी मुकुटासारखं असतं, असंही त्या म्हणाल्या.

खेर यांच्या नियुक्तीचं स्वागत
सुभाष घई, मुधर भांडारकर, अशोक पंडित यांच्यासह अनेक दिग्दर्शकांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. “या पदासाठी अनुपम खेर योग्य व्यक्ती आहे. तुम्हाला मार्गदर्शन करणारी व्यक्ती चांगली असायला हवी. अनुपम खेर चांगले शिक्षक ठरतील,” असं असं सुभाष घई म्हणाले.

मधुर भांडारकर म्हाणाले की, “ते विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देतील आणि संस्थेला नवी उंचीवर नेऊन ठेवतील. ते 30-35 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. ते फारच विश्वासार्ह आहेत. कोण कोणत्या पक्षाचा समर्थक आहे हे न पाहता लोकांनी त्याचं काम पाहायला हवं.”

गजेंद्र चौहान यांना विरोध का?
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेते आणि भाजप कार्यकर्ते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली होती. याला विद्यार्थ्यांचा विरोध होता. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी जवळपास 100 दिवसांपेक्षा जास्त आंदोलन केलं.

मोदी सरकार हेकेखोरपणा करत असून स्वायत्त संस्थांच्या प्रतिष्ठेला तडा देण्याचं काम सुरु असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. गजेंद्र चौहानांच्या निवडीद्वारे एफटीआयआयमध्ये राजकीय हस्तक्षेप करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. जो कधीही खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली.

‘महाभारत’मध्ये युधिष्ठीरची भूमिका निभावणारे गजेंद्र चौहान भाजप पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक होते. सध्या ते भाजपचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. शिवाय अनेक मालिकातून त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिकाही साकारल्या आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे एफटीआयच्या अध्यक्षपदी गीतकार गुलझार, दिग्दर्शक शाम बेनेगल आणि अधूर गोपालकृष्णन यांची नावंही चर्चेत होती. मात्र त्या सगळ्यांना मागे टाकत गजेंद्र चौहान यांच्या नावावर माहिती आणि प्रसारण खात्याने शिक्कामोर्तब केल्याने सर्वसामान्यही अवाक् झाले.

संबंधित बातम्या

FTII च्या विद्यार्थ्यांचं जंतरमंतरवर आंदोलन, गजेंद्र चौहानांच्या निवडीविरोधात संसदेवर मोर्चा

‘संघाचे विचार लादण्याचा प्रयत्न’, FTII विद्यार्थ्यांच्या पाठिशी राहुल गांधी 

गजेंद्र चौहान यांना विरोध करणारे हिंदूविरोधी : संघ

आंदोलन सुरूच राहणार, FTII च्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला ठणकावलं

‘बजरंगी भाईजान’ FTII च्या विद्यार्थ्यांच्या पाठिशी; गजेंद्र चौहानांनी राजीनामा द्यावा, सलमानचा सल्ला

आंदोलन थांबवा, अन्यथा कठोर कारवाई करू, FTII च्या विद्यार्थ्यांना नोटीस

गजेंद्र चौहानांविरोधात बॉलिवूडमधून आवाज; ऋषी कपूर, अनुपम खेर विद्यार्थ्यांच्या पाठीशी

FTII च्या प्रमुखपदी प्रेरणादायी व्यक्ती असावं, रणबीर कपूरचा आंदोलनाला पाठिंबा

FTII बंद की मुंबईला हलवणार? माहिती प्रसारण खात्याच्या सूचनेनं नव्या वादाला तोंड

FTII च्या मुलांवर अन्याय होतोय, अभिनेत्री पल्लवी जोशींची टीका; संचालकपदाचाही राजीनामा

‘एफटीआयआय’च्या वादात ‘आप’ची उडी, कॅम्पसमध्ये भाजपविरोधात निदर्शने

FTIIमध्ये ‘महाभारत’, अध्यक्षपदी अभिनेता गजेंद्र चौहानांची नियुक्ती, विद्यार्थी आक्रमक 

 

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Veteran actor Anupam Kher appointed as FTII chairperson
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

वाढत्या प्रदुषणामुळं 25 लाख भारतीयांचा मृत्यू!
वाढत्या प्रदुषणामुळं 25 लाख भारतीयांचा मृत्यू!

नवी दिल्ली : संपूर्ण देशात 2015 मध्ये जल, वायू आणि इतर प्रकारच्य़ा

देशाचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांचा राजीनामा
देशाचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांचा राजीनामा

नवी दिल्ली : देशाचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी आपल्या पदाचा

‘दाऊदच्या संपत्तीच्या लिलावात त्याच्याच हस्तकांची घुसखोरी’
‘दाऊदच्या संपत्तीच्या लिलावात त्याच्याच हस्तकांची घुसखोरी’

मुंबई : भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम भोवतीचा फास घट्ट

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न

पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशात, जवानांसोबत दिवाळी साजरी
पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशात, जवानांसोबत दिवाळी साजरी

जम्मू काश्मीर : पंतप्रधान झाल्यापासून सीमेवर दिवाळी साजरी

फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा IAS अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप
फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा IAS अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप

कोलकाता : मुंबईत राहणाऱ्या महिलेने एका आयएएस अधिकाऱ्याविरोधात

हरियाणात 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून हत्या
हरियाणात 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून हत्या

पानिपत : हरियाणातील पानिपतमध्ये 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून

सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं अनैतिक : दारुल उलूम देवबंद
सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं अनैतिक : दारुल उलूम देवबंद

  सहारनपूर (उत्तर प्रदेश) : मुस्लिम पुरुष आणि महिलांनी सोशल

जीएसटी, नोटाबंदीमुळं कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिवाळी गिफ्ट्सला कात्री
जीएसटी, नोटाबंदीमुळं कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिवाळी गिफ्ट्सला...

मुंबई : दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गिफ्टमध्ये

माफ करा, मी नोटाबंदीचं समर्थन केलं होतं : कमल हसन
माफ करा, मी नोटाबंदीचं समर्थन केलं होतं : कमल हसन

तामिळनाडू : मोदी सरकारच्या नोटाबंदीची स्तुती करणाऱ्या अभिनेता कमल