पोटच्या मुलाला अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल

पश्चिम बंगळुरुच्या केंगेरी परिसरात एका बापाने आपल्या दहा वर्षाच्या मुलाला जीव जाईपर्यंत पट्ट्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मुलाच्या 30 वर्षीय बापाला अटक केली आहे.

पोटच्या मुलाला अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल

बंगळुरु : पश्चिम बंगळुरुच्या केंगेरी परिसरात एका बापाने आपल्या दहा वर्षाच्या मुलाला जीव जाईपर्यंत पट्ट्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मुलाच्या 30 वर्षीय बापाला अटक केली आहे.

लहान मुलं आपली एखादी लहानशी चूक लपवण्यासाठी अनेकदा खोटं बोलतात. पण केंगेरी परिसरातल्या एका मुलाने आपल्या बापाशी खोटं बोलल्याने, 30 वर्षीय महेंद्रने त्याला पट्ट्याने चोपले. हा मुलगा आपल्या चुकीबद्दल वडिलांकडे क्षमा याचना करत होता. पण तरीही त्याचा बाप काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने आपल्या मुलाला पट्ट्याने बेदम चोपले. आणि त्यानंतर गादीवर उचलून फेकले.

ही घटना दोन महिन्यापूर्वीची असून, याचा व्हिडीओ मुलाच्या आईनेच बनवल्याचे समोर आलं आहे.

मुलाची आई आपल्या पतीला ही मारझोड थांबवण्याची विनंती करत होती. पण तो तिच्या विनंतीलाही प्रतिसाद देत नव्हता. या महिलेने आपला मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी दिला होता. यावेळी तिने मोबाईलमधील डेटा डिलीट करु नये, अशी विनंती कंपनीकडे केली होती.

पण सर्व्हिस सेंटरमधील एका व्यक्तीने हा व्हिडीओ पाहिला, आणि याने याची माहिती तात्काळ एका स्वयंसेवी संस्थेला दिली. यानंतर पोलिसांनी याची दखल घेत, माध्यम प्रतिनिधींच्या मदतीने याची सत्यता पडताळली. यानंतर शनिवारी सकाळी मारझोड करणाऱ्या पित्यास अटक केली.

व्हिडीओ पाहा

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Video of a father assaulting his 10-yr-old son has gone viral
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV