विजय गोखले होणार भारताचे नवे परराष्ट्र सचिव

चीनमध्ये राजदूत म्हणून काम केलेल्या विजय गोखले या मराठी अधिकाऱ्याकडे देशाच्या परराष्ट्र धोरणाची सर्वोच्च प्रशासकीय सूत्रे सोपवली जाणार आहेत.

विजय गोखले होणार भारताचे नवे परराष्ट्र सचिव

नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र सचिवपदाची धुरा विजय केशव गोखले यांच्या खांद्यावर सोपवली जाणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोखले यांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली.

चीनमध्ये राजदूत म्हणून काम केलेल्या विजय गोखले या मराठी अधिकाऱ्याकडे देशाच्या परराष्ट्र धोरणाची सर्वोच्च प्रशासकीय सूत्रे सोपवली जाणार आहेत.

सध्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्या जागी विजय गोखले यांची नियुक्ती होणार आहे. जयशंकर यांची 29 जानेवारी 2015 रोजी परराष्ट्र सचिवपदी दोन वर्षांसाठी नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांना गेल्या वर्षी म्हणजे जानेवारी 2017 मध्ये एका वर्षाची वाढही देण्यात आली होती.

कोण आहेत विजय गोखले?

मूळचे पुण्यातील असलेले विजय केशव गोखले हे 1981 च्या आयएफएस बॅचचे अधिकारी आहेत.

सध्या परराष्ट्र खात्यातील आर्थिक विषयक विभागात सचिव आहेत.

विजय गोखले यांनी चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले होते. भारत-चीनमधील संवेदनशील संबंधांदरम्यान गोखले चीनमध्ये भारताचे राजदूत होते. त्यामुळे या दोन्ही देशांमधील संबंधांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे.

याआधी विजय गोखले यांनी जर्मनी आणि हाँगकाँगमध्येही भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे.

विशेष म्हणजे, याआधीही मूळचे पुण्यातीलच असलेले राम साठे हे 1979 ते 1982 या काळात देशाचे परराष्ट्र सचिव होते. त्यामुळे विजय केशव गोखले यांच्या रुपाने भारताच्या परराष्ट्र सचिवपदी दुसरी मराठी व्यक्ती विराजमान होणार आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Vijay Keshav Gokhale appointed as Foreign Secretary of India
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV