लंडनमध्ये विजय मल्ल्या 'एबीपी'च्या कॅमेऱ्यात कैद, पत्रकाराला मल्ल्याची उद्धट उत्तरं

By: | Last Updated: > Friday, 9 June 2017 8:03 AM
लंडनमध्ये विजय मल्ल्या 'एबीपी'च्या कॅमेऱ्यात कैद, पत्रकाराला मल्ल्याची उद्धट उत्तरं

लंडन : भारतातल्या बँकांना तब्बल 9 हजार कोटींनी चुना लावून पळ काढलेला विजय मल्ल्या एबीपी नेटवर्कच्या कॅमेऱ्यासमोर आला. बर्मिंघममध्ये मॅच पाहायला आलेल्या मल्ल्याला एबीपी न्यूजच्या पत्रकारानं गाठलं. मात्र यावेळीही मल्ल्यानं एबीपीच्या पत्रकाराला उद्धट उत्तरं दिली.

काल गुरुवारी लंडनमध्ये फिरताना विजय मल्ल्या एबीपी न्यूजच्या पत्रकाराला दिसला. साहजिकच मल्ल्याशी बोलण्याचा प्रयत्न पत्रकारानं केला. मात्र मल्ल्यानं उद्धट उत्तरांशिवाय काहीच सांगितलं नाही. पत्रकारानं सर्वात आधी मल्ल्याच्या तब्येतीची विचारपूस केली. मात्र या प्रश्नाचं उत्तर देणं मल्ल्यानं टाळलं. त्यानंतर पत्रकारानं मल्ल्याला क्रिकेट मॅच एन्जॉय केली का अशी विचारणा केली. त्यावर मी मॅच एन्जॉय केली पण भारतीय संघाच्या निकालांवर समाधानी नसल्याचं सांगितल.

त्यानंतर एबीपी न्यूजच्या पत्रकारानं मल्ल्याला भारतात पुन्हा कधी येणार असा प्रश्न विचारला, यावर तुम्ही इथे मॅच पाहायला आला आहात, की मी भारतात कधी येणार हे जाणून घ्यायला असा उद्धट प्रतिप्रश्नच मल्ल्यानं पत्रकाराला विचारला.

विजय मल्ल्यावर भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. मल्ल्याने 15 महिन्यांपूर्वी भारत सोडून लंडनला पळ काढला होता. भारताने यंदा 8 फेब्रुवारी रोजी ब्रिटनकडे विजय मल्ल्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. ही याचिका मार्चमध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे पाठवली होती.

व्हिडिओ :

First Published:

Related Stories

लॉकरमधून वस्तू चोरी झाल्यास बँक जबाबदार नाही : RBI
लॉकरमधून वस्तू चोरी झाल्यास बँक जबाबदार नाही : RBI

मुंबई : तुमच्या बँकेतील लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू चोरीला

देशभरात रमजान ईदचा उत्साह, नमाजासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी
देशभरात रमजान ईदचा उत्साह, नमाजासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी

मुंबई : आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा केला जात

भारताच्या विकासात योगदान द्या, मोदींचं अमेरिकेतील 21 टॉप कंपन्यांना आवाहन
भारताच्या विकासात योगदान द्या, मोदींचं अमेरिकेतील 21 टॉप कंपन्यांना...

वॉशिंग्टन : भारत एक व्यवसायासाठी अनुकूल देश म्हणून समोर येत आहे.

GST : 1 जुलैला सकाळी उठल्यानंतर तुमच्या-आमच्या जीवनावर काय परिणाम?
GST : 1 जुलैला सकाळी उठल्यानंतर तुमच्या-आमच्या जीवनावर काय परिणाम?

नवी दिल्ली : 1 जुलैला सकाळी उठल्यानंतर तुम्ही कॉफी पिणार असाल तर ती

जीएसटीनंतर या वस्तू स्वस्त, तुमचे पैसे कुठे वाचणार?
जीएसटीनंतर या वस्तू स्वस्त, तुमचे पैसे कुठे वाचणार?

नवी दिल्ली : देशात 1 जुलै पासून जीएसटी अर्थात नवी कर प्रणाली लागू

जीएसटी लागू झाल्यानंतर या वस्तू महागणार!
जीएसटी लागू झाल्यानंतर या वस्तू महागणार!

नवी दिल्ली : देशात 1 जुलैपासून जीएसटी अर्थात नवी कर प्रणाली लागू

जम्मू-काश्मीरमध्ये रोप वेची केबल तुटली, 7 पर्यटकांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये रोप वेची केबल तुटली, 7 पर्यटकांचा मृत्यू

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील प्रसिद्ध

रक्तातही भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तीन जण जाब्यात
रक्तातही भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तीन जण जाब्यात

हैदराबाद : मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक रक्ताची

पंतप्रधान मोदींकडून आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा
पंतप्रधान मोदींकडून आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 33 व्या ‘मन की

काँग्रेस नेते शंकर सिंह वाघेलांचे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत
काँग्रेस नेते शंकर सिंह वाघेलांचे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे...

गांधीनगर : गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते