बिहारमध्ये आणखी एक भूकंप, जेडीयूमध्ये फूट?

शरद यादव महायुतीमध्ये राहण्यासाठी, जेडीयूतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना करु शकतात, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

By: | Last Updated: > Thursday, 3 August 2017 7:26 AM
vijay verma says sharad yadav may form new party

पाटणा : बिहारमध्ये जेडीयूने महायुतीमधून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर, आणखी एक राजकीय भूकंपाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद यादव वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचे संकेत जेडीयूचे माजी आमदार आणि शरद यादव यांचे निकटवर्तीय विजय वर्मा यांनी दिले आहेत.

एबीपी न्यूजशी बोलताना वर्मा यांनी शरद यादव महायुतीमध्ये राहण्यासाठी, जेडीयूतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना करु शकतात, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

विजय वर्मा म्हणाले की, ”सध्या शरद यादव जुन्या सहकाऱ्यांच्या संपर्कात असून, बिहारमधील राजकीय परिस्थितीवर त्यांच्याशी चर्चा करत आहेत. ते सध्या नव्या पक्षाची स्थापना करण्यासाठी चाचपणी करत आहेत.” विशेष म्हणजे, शरद यादव यांचा धर्मनिरपेक्ष शक्तींच्या महायुतीमध्ये राहण्याकडे जास्त कल असल्याचा दावाही वर्मा यांनी केला आहे.

वर्मांनी पुढे सांगितलं की, ”शरद यादव यांनी यासाठी काँग्रेस नेते गुलाम नबी अझाद आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरींची भेट घेतली आहे. शिवाय, एनडीए सरकारमध्ये सहभागी होऊन, मंत्रीपदाची शपथ घेण्यास स्पष्ट नकार दिल्याचीही माहिती वर्मा यांनी दिली.

पण शरद यादव कुणाच्या संपर्कात आहेत, याबाबत विचारले असता, यावर अधिक खुलासा करण्याचं वर्मा यांनी टाळलं.

दरम्यान, जेडीयूचे सरचिटणीस के.सी.त्यागी या वृत्ताचं खंडण करुन, या सर्व अफवा असल्याचं सांगितलं आहे. तर जेडीयूचे प्रवक्ते अजय आलोक यांनी शरद यादव नाराज असल्याचं वृत्त फेटाळलं आहे.

के.सी त्यागी याप्रकरणी म्हणाले की, ”गेल्या 40 वर्षांपासून शरद यादव यांना मी जवळून ओळखतो. भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या बाजूने ते कशाला जातील?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दुसरीकडे जेडीयूचे दोन खासदार अली अनवर आणि विरेंद्र कुमार यांनी शरद यादव यांची भेट घेतली आहे. या दोन्ही खासदारांनी जेडीयूने भाजपसोबत जाण्यास कडाडून विरोध केला आहे.

संबंधित बातम्या

नितीश कुमार सत्तेचे भुकेले, लालूप्रसाद यादव यांचं टीकास्त्र

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:vijay verma says sharad yadav may form new party
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी बेळगावात लिंगायत समाज एकवटला!
स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी बेळगावात लिंगायत समाज एकवटला!

बेळगाव : लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यावी आणि

गोव्यात उद्या पोटनिवडणूक, पर्रिकरांसोबत राणेंचीही प्रतिष्ठा पणाला
गोव्यात उद्या पोटनिवडणूक, पर्रिकरांसोबत राणेंचीही प्रतिष्ठा...

पणजी (गोवा) :  पणजी व वाळपई पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार सोमवारी

मोदी म्हणाले, निर्णय ऐतिहासिक, अमित शाह म्हणतात नव्या युगाची सुरुवात
मोदी म्हणाले, निर्णय ऐतिहासिक, अमित शाह म्हणतात नव्या युगाची...

नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी आज

तिहेरी तलाकविरोधात तातडीने कायदा करु: मेनका गांधी
तिहेरी तलाकविरोधात तातडीने कायदा करु: मेनका गांधी

नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज

Triple Talaq : 3 विरुद्ध 2 ने तलाकवर मात, कोर्ट रुम 1 मध्ये नेमकं काय घडलं?
Triple Talaq : 3 विरुद्ध 2 ने तलाकवर मात, कोर्ट रुम 1 मध्ये नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी आज

तिहेरी तलाक : मुस्लीम महिलांचा आवाज...शायरा बानो
तिहेरी तलाक : मुस्लीम महिलांचा आवाज...शायरा बानो

मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज

Triple Talaq : 5 पाईंटमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल
Triple Talaq : 5 पाईंटमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल

नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज

तिहेरी तलाकवर आजपासून बंदी: सुप्रीम कोर्ट
तिहेरी तलाकवर आजपासून बंदी: सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज

‘तिहेरी तलाक’ सुनावणीत आतापर्यंत नेमकं काय-काय झालं?
‘तिहेरी तलाक’ सुनावणीत आतापर्यंत नेमकं काय-काय झालं?

नवी दिल्ली : तिहेरी तलाक प्रकरणी आज सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल देणार

देशभरातील बँकांचा खासगीकरणाविरोधात एकदिवसीय संप
देशभरातील बँकांचा खासगीकरणाविरोधात एकदिवसीय संप

मुंबई : देशभरातील बँका आज बंद राहणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील