प्रिया वारियरने कतरीनासह सनी लिओनलाही मागे टाकलं!

सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट आजकाल अगदी चुटकीसरशी व्हायरल होत असते. गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर आपल्या अनोख्या शैलीमुळे दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया वारीयरने लोकप्रियतेमध्ये सनी लिओनलाही मागे टाकलं आहे. दोन दिवसांमध्ये प्रिया वारियरला गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे.

प्रिया वारियरने कतरीनासह सनी लिओनलाही मागे टाकलं!

मुंबई : सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट आजकाल अगदी चुटकीसरशी व्हायरल होत असते. गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर आपल्या अनोख्या शैलीमुळे दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया वारीयरने लोकप्रियतेमध्ये सनी लिओनलाही मागे टाकलं आहे. दोन दिवसांमध्ये प्रिया वारियरला गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचा लवकरच सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याच सिनेमातील एका गाण्यामुळे गेल्या 24 तासात प्रिया वारियरला सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे. सनीसोबतच कतरीना कैफ, आलिया भट्ट आणि दीपिका पादुकोणलाही प्रियाने मागे टाकलं आहे.

priya varrier google search

गेल्या आठवड्याभरापासून एक तरुणी सोशल मीडिया सेन्सेशन ठरली आहे. शाळेच्या गॅदरिंगमध्ये एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थिनीकडे रोखून बघतो. दोघांमध्ये नजरानजर होते आणि 'आँखो ही आँखो में बात हो गई' असा काहीसा प्रकार घडतो. या तरुणीने नजरेने सोडलेल्या बाणाने तिचा मित्र तर घायाळ होतोच, मात्र हा व्हिडिओ पाहणारे नेटिझन्सही गार झाले आहेत.

ही तरुणी आहे प्रिया प्रकाश वॉरियर. प्रिया अवघी 18 वर्षांची आहे. केरळातील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.

कोण आहे प्रिया वारियर?

ओमर लुलू यांच्या 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातून प्रिया पदार्पण करत आहे. 'मणिक्या मलराया पूवी' हे गाणं रिलीज करण्यात आलं. व्हायरल झालेली क्लीप ही त्याच गाण्याचा एक भाग आहे. हे गाणं शान रहमानने संगीतबद्ध केलं असून विनीथ श्रीनिवासनने गायलं आहे.

प्रिया फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे. इन्स्टा पेजवर तिचे डान्स, मॉडेलिंग आणि अभिनयाच्या कारकीर्दीतील फोटो पाहायला मिळत आहेत. पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच तिला दुसरं प्रोजेक्टही मिळालं आहे.

प्रियाचा व्हिडिओ व्हायरल होण्यावर प्रकरण थांबलं नाही, तर तिचे मीम्स, ट्रोल्सही झाले. 'आई, सूनबाई मिळाली', हीच माझी व्हॅलेंटाईन, शी इज माय लेटेस्ट क्रश अशा प्रतिक्रिया काहींनी दिल्या, तर काही जणांना याचं काहीच कौतुक वाटत नाही. मात्र काहीही असो, आपल्या अदांनी प्रियाने दखल घ्यायला भाग पाडलं आहे.

पाहा व्हिडीओ :

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: viral priya prakash in googles top searches latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV