व्हायरल सत्य : अखिलेश यादव हे योगी आदित्यनाथ यांचे मेहुणे?

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Tuesday, 21 March 2017 9:00 AM
व्हायरल सत्य : अखिलेश यादव हे योगी आदित्यनाथ यांचे मेहुणे?

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ विराजमान झाले. त्याचवेळी सोशल मीडियावर आदित्यनाथांविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. आदित्यनाथ आणि मुलायम सिंह यादव यांच्यामध्ये नातं असल्याचे दावे केले जात आहेत. ‘एबीपी न्यूज’ने यामागील व्हायरल सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे.

आदित्यनाथ हे मुलायम सिंह यादव यांच्या मोठ्या सूनबाई डिंपल यादव आणि धाकट्या सूनबाई अपर्णा यादव यांच्या नात्यात असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. म्हणजेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मेहुणे असल्याचं व्हायरल झालं आहे.

काय आहे व्हायरल मेसेज?

‘मुलायम सिंह यादव यांच्या दोन्ही सुना डिंपल आणि अपर्णा या ठाकूर कुटुंबातील आहेत. मुलायम सिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव यांच्या आत्याचा मुलगा म्हणजे अजय सिंह बिश्त. अजय सिंह बिश्त यांना योगी आदित्यनाथ म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे आदित्यनाथ हे अखिलेश यांचे मेहुणे लागतात. योगी हे पौडी गढवाल उत्तराखंडचे मूळ रहिवासी आहेत. आठ दिवस उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवाराचा शोध घेतल्यानंतरही भाजपला समाजवादी पक्षाशी संबंधितच व्यक्ती मिळाली. अभिनंदन’ असा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे.

योगी आदित्यनाथ आणि मुलायम सिंह यांच्या कुटुंबात नातं असल्याचे दावे आश्चर्यचकित करणारे आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात दोघंही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. योगी आदित्यनाथ यांचा जन्म उत्तराखंडमधील पौडी गढवालमध्ये झाल्यामुळे अनेकांचा या मेसेजवर विश्वास बसत आहे. मुलायम यांच्या दोन्ही सुनांचेही उत्तराखंडशी संबंध आहेत. मात्र या व्यतिरिक्त दोघांमध्ये कोणते संबंध आहेत का, हे पाहण्यासाठी एबीपी न्यूजने व्हायरल मेसेजची पडताळणी केली.

एबीपी न्यूजने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजची तपासणी करण्यासाठी थेट योगी आदित्यनाथ यांचंच घर गाठलं. या मेसेजमध्ये काही तथ्य आहे का, हा प्रश्न योगी आदित्यनाथ यांच्या आई-वडिलांना विचारला असता, त्यांनी तो साफ धुडकावून लावला. त्यामुळे साहजिकच योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यांच्यात नातं असल्याबाबत व्हायरल झालेला मेसेज सत्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

First Published: Monday, 20 March 2017 9:45 PM

Related Stories

अँटी रोमियो पथकाच्या नावावर तरुण-तरुणींना त्रास, तीन पोलीस निलंबित
अँटी रोमियो पथकाच्या नावावर...

लखनऊ : उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या

भूक असेल तेवढंच अन्न घ्या, वाया घालवू नका : पंतप्रधान मोदी
भूक असेल तेवढंच अन्न घ्या, वाया घालवू...

नवी दिल्ली : अन्न वाया घालवू नका, ताटात शिल्लक ठेवू नका, असं आवाहन

चिप असलेल्या ई-पासपोर्टला मंजुरी
चिप असलेल्या ई-पासपोर्टला मंजुरी

नवी दिल्ली : ई-पासपोर्ट बनवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक काँटॅक्टलेस

ट्रेनमध्ये आता ‘विकल्प’, वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना नो टेन्शन !
ट्रेनमध्ये आता ‘विकल्प’, वेटिंग...

नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान रेल्वे तिकीट कन्फर्म

लवकरच वाहन परवान्यासाठीही आधार कार्ड सक्तीचं
लवकरच वाहन परवान्यासाठीही आधार...

नवी दिल्ली : बनावट वाहन परवाना तयार करण्याच्या प्रकाराला आळा

अरुण जेटलींची मानहानी केल्याप्रकरणी केजरीवालांवर आरोप निश्चित
अरुण जेटलींची मानहानी केल्याप्रकरणी...

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांची मानहानी केल्याप्रकरणी

आयकरच्या कारवाईत 49 हजार 247 कोटींची काळी संपत्ती उघड
आयकरच्या कारवाईत 49 हजार 247 कोटींची...

नवी दिल्ली : गेल्या चार वर्षात आयकर विभागानं केलेल्या कारवाईत तब्बल

गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात हक्कभंग आणणार
गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या...

नवी दिल्ली : विमानसेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात शिवसेना

बांगलादेश-पाकिस्तानच्या सीमा सील करणार : राजनाथ सिंह
बांगलादेश-पाकिस्तानच्या सीमा सील...

ग्वाल्हेर : बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमा लवकरात लवकर सील

देवेंद्र फडणवीसांच्या पाच आयडिया योगी आदित्यनाथांनी मागवल्या
देवेंद्र फडणवीसांच्या पाच आयडिया...

मुंबई : देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या