व्हायरल सत्य : पंतप्रधान मोदी मशरुम खाल्ल्यामुळे गोरे?

गुजरात विधानसभेच्या प्रचाराच्या धुराळ्यात मोदींबरोबरच त्यांना गोरं करणारे कथित मशरुमही चर्चेत राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रंग गोरा होण्यासाठी चक्क तैवानहून 4 लाख रुपयांचे मशरुम मागवतात, तसंच प्रत्येकी 80 हजार रुपये किंमतीचे एकूण पाच मशरुम दर दिवशी खातात, असा दावा काँग्रेसच्या अल्पेश ठाकोरनं केला. अल्पेशच्या या विधानानंतर मशरुमची बरीच चर्चाही सुरु झाली. मात्र, मोदी खरोखर मशरुम खातात का? मोदी मशरुम खात असले, तरीही मशरुमनं रंग गोरा होतो का? अशा अनेक प्रश्नांची पडताळणी ‘माझा’ने केली.

व्हायरल सत्य : पंतप्रधान मोदी मशरुम खाल्ल्यामुळे गोरे?

मुंबई : गुजरात विधानसभेच्या प्रचाराच्या धुराळ्यात मोदींबरोबरच त्यांना गोरं करणारे कथित मशरुमही चर्चेत राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रंग गोरा होण्यासाठी चक्क तैवानहून 4 लाख रुपयांचे मशरुम मागवतात, तसंच प्रत्येकी 80 हजार रुपये किंमतीचे एकूण पाच मशरुम दर दिवशी खातात, असा दावा काँग्रेसच्या अल्पेश ठाकोरनं केला. अल्पेशच्या या विधानानंतर मशरुमची बरीच चर्चाही सुरु झाली.  मात्र, मोदी खरोखर मशरुम खातात का?  मोदी मशरुम खात असले, तरीही मशरुमनं रंग गोरा होतो का? अशा अनेक प्रश्नांची पडताळणी ‘माझा’ने केली.

मशरुमशी निगडीत अनेक प्रश्न गुजरात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ऐरणीवर आले. अल्पेश ठाकोरनं गुजरातच्या बसानकांठातील जाहीर सभेत मशरुमवरुन मोदींवर निशाणा साधला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली.

अल्पेश ठाकोर यांच्या या आरोपांनंतर अनेकांना मशरुमविषयी जाणून घेण्याची उत्सुकताही निर्माण झाली. अनेकांनी गुगल, सोशल साईट्सवरुन मशरुमची जणू शोधमोहीमच उघडली.

मात्र या साऱ्या मोहिमेनंतरही काही प्रश्न अनुत्तरीतच राहिले. खरोखरच मशरुन खाल्ल्याने कुणी गोरा होतो का? एक मशरुम 80 हजार रुपयांना मिळावं इतकं खरच ते मौल्यवान आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी खरोखरच तैवानहून मागवलेलं महागडं मशरुम खातात का?

या साऱ्या अनुत्तरित प्रश्नांची पडताळणी एबीपी माझानं केली. यात विविध जाणकारांचं मतही माझानं विचारलं. बरीच माहिती गोळा केली. यात अनेक बाबी आमच्या निदर्शनास आल्या.

यात युरोपपासून चीनपर्यंत मशरुमच्या शेकडो प्रजाती आढळतात. त्यातल्या काही जाती विषारीसुद्धा आहेत, ज्यामुळे माणसाचा मृत्यूही ओढवला जाऊ शकतो, असं आमच्या अभ्यासात समोर आलं.

मात्र आम्ही त्या 80 हजार रुपयांच्या गोरं बनवणाऱ्या मशरुमच्या शोधात होतो. बरीच शोधाशोध केल्यानंतर तैवान आणि मशरुमविषयी निगडीत असणाऱ्या काही बाबी आमच्या समोर आल्या. तैवानमध्ये मशरुमचं पीक घेण्याची परंपरा फार जुनी आहे. जगात तैवानच मशरुमचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.

मात्र अल्पेश ठाकोर ज्या 80 हजार रुपयांच्या मशरुमचा दावा करत आहेत, त्याला एका भाजप नेत्याकडूनच चोख प्रत्युत्तर मिळालं आहे. भाजपचे नेते तेजिंदर बग्गां यांनी ट्विटरवरुन एका तैवानच्या महिलेचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत त्या महिलेने गोरं बनवणाऱ्या मशरुमचा दावा खोडून काढला आहे.

मात्र, या महिलेचा व्हिडीओ भाजप नेत्याकडे कसा आला हे पाहण्यासाठी ‘माझा’ने तेजिंदर बग्गा यांची बाजूही जाणून घेतली.

मशरुमच्या या प्रकरणात प्रत्येकाचे स्वत:चे दावे आणि प्रतिदावे होते. म्हणून आम्ही प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्याकडे पोहोचलो. मशरुमबाबत त्यांना बरीच माहिती आहे आणि शिवाय त्यांनी पंतप्रधान मोदींसाठी अनेकदा जेवणही बनवलं आहे.

शेफ संजीव कपूर यांनी मशरुमचा एक छोटासा तुकडा 80 हजार रुपयांचा असल्याची  बाब अमान्य केली. त्यामुळे अल्पेश ठाकूर यांचा पहिला दावा साफ खोटा ठरला.

मात्र आता प्रश्न होता तो म्हणजे मशरुममुळे रंग गोरा होण्याचा. त्यासाठी आम्ही दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमधल्या त्वचा तज्ज्ञांशी चर्चा केली.

या हॉस्पिटलमधील त्वचारोग तज्ज्ञ मुक्ता वशिष्ठ यांनी स्पष्ट केलं की, वारंवार मशरुम खाल्ल्यामुळे शरीर सदृढ राहतं, मात्र त्याचा रंग गोरा होण्याशी काहीही संबंध नाही.

त्यामुळे आता प्रश्न उरला होता की अल्पेश ठाकोर यांनी कोणत्या आधारावर मशरुममुळे रंग गोरा होण्याचा दावा केला?.. .याची विचारणा आम्ही खुद्द अल्पेश ठाकोर यांच्याकडेच केली.

मात्र प्रचाराच्या धुराळ्यात केलेल्या आरोपांवर अल्पेश ठाकूर कोणताही पुरावा देऊ शकले नाहीत. एबीपी ‘माझा’च्या पडताळणीत अल्पेश ठाकोर यांचा दावा सपशेल खोटा ठरला.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: viral satya of mashroom which modi eats for fairness latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV