500 रुपयाच्या खऱ्या आणि बनावट नोटेचं व्हायरल सत्य

सध्या सोशल मीडियात 500 रुपयांच्या नव्या नोटेचा फोटो कमालीचा व्हायरल होत आहे. या फोटोद्वारे 500 रुपयांच्या बनावट नोटाही चलनात आल्याचा दावा केला जात आहे. तसेच यातील खरी नोट कोणती आणि खोटी नोट कोणती, हे ओळखण्यासंदर्भात याबाबतही सांगितलं जात आहे.

500 रुपयाच्या खऱ्या आणि बनावट नोटेचं व्हायरल सत्य

 

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियात 500 रुपयांच्या नव्या नोटेचा फोटो कमालीचा व्हायरल होत आहे. या फोटोद्वारे 500 रुपयांच्या बनावट नोटाही चलनात आल्याचा दावा केला जात आहे. तसेच यातील खरी नोट कोणती आणि खोटी नोट कोणती, हे ओळखण्यासंदर्भात याबाबतही सांगितलं जात आहे.

व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये म्हटलंय की, “ज्या 500 रुपयाच्या नोटेवरील आरबीआयची तार महात्मा गांधींच्या फोटो जवळ आहे, ती नोट कोणीही घेऊ नये. कारण, ही नोट बनावट आहे. त्यामुळे 500 रुपया ज्या नोटेवर आरबीआयची तार गव्हर्नरांच्या हस्ताक्षराला क्रॉस करत जाईल, तिच नोट स्विकारावी, असं आवाहन करण्यात येत आहे.

500-3

या मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी एबीपी माझाने रिझर्व बँकेच्या वेबसाईटवरील माहिती तपासून पाहिली. त्यामध्ये आरबीआयने 500 रुपयाची नवी नोट खरी आहे की बनावट आहे, हे ओळखण्यासंदर्भात 12 पद्धती दिल्या आहेत. यातील 5 क्रमांकावरील पद्धतीमध्ये हिरव्या रंगातील आरबीआयच्या तारेसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानुसार, ही तार गांधीजींच्या फोटोजवळही नाही, आणि गव्हर्नरच्या हस्ताक्षराजवळही नाही.

आरबीआयने सांगितल्याप्रमाणे, 500 रुपयाची नोट तिरकी केल्यास त्यातील हिरव्या रंगाची तार निळ्या रंगात दिसते. ही तार नोटेमध्ये नेमके कुठे असावी? याबद्दल आरबीआयने काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

त्यामुळे व्हायरल मेसेजमधील हा दावा खोटा असल्याचं एबीपी माझाच्या पडताळणीत समोर आलं आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV