‘चप्पल चोर पाकिस्तान!’ कुलभूषण प्रकरणी अमेरिकेत घोषणाबाजी

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या अपमानाचे पडसाद आता अमेरिकेतही उठले आहेत. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील पाकिस्तानच्या दूतावासा बाहेर भारतीय आणि बलूच नागरिकांनी तीव्र निदर्शनं केली.

‘चप्पल चोर पाकिस्तान!’ कुलभूषण प्रकरणी अमेरिकेत घोषणाबाजी

वॉशिंग्टन : कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या अपमानाचे पडसाद आता अमेरिकेतही उठले आहेत. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील पाकिस्तानच्या दूतावासा बाहेर भारतीय आणि बलूच नागरिकांनी तीव्र निदर्शनं केली. यावेळी निदर्शन करणाऱ्यांच्या हातात ‘चप्पल चोर पाकिस्तान’चे बॅनर होते. याशिवाय, निदर्शकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करुन पाकिस्तानच्या कृतीचा निषेध केला.

जाधव कुटुंबीयांना अपमानित करणं हे आधीच ठरलं होतं?

गेल्या वर्षी 25 डिसेंबरमध्ये पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेल्या कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांच्या आई आणि पत्नी इस्लामाबादमध्ये गेल्या होत्या. या भेटीदरम्यान, पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला चप्पल काढायला लावलं होतं.इतकंच नाही तर दोघींनाही मंगळसूत्र, बांगड्या आणि टिकल्याही काढायला लावल्या होत्या. याशिवाय दोघींना त्यांचे कपडेही बदलण्यास सांगितलं होतं. तसेच, कुलभूषण यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या आई आणि पत्नीला मातृभाषेत म्हणजेत मराठीत बोलू दिलं नाही.

पाक मीडियाने लायकी दाखवली, कुलभूषण कुटुंबीयांना अपमानास्पद प्रश्न

विशेष म्हणजे, पाकिस्तानचा नालायक पणा इतक्यावरही थांबला नाही. तर त्यांनी कुलभूषण जाधव यांच्या पत्नीचे चप्पला फॉरेन्सिक तपासासाठी ताब्यात घेतल्या. पण फॉरेन्सिक तपासात पाकच्या अधिकाऱ्यांना काहीही मिळालं नाही.

या सर्व घटनेवर भारतीयांकडून संताप व्यक्त होत आहे. याचे पडसाद लोकसभेतही उमटले होते. लोकसभेत यावर निवेदन देताना, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला चांगलच खडसावलं होतं. तर आता या घटनेचे पडसाद अमेरिकेतही उमटत आहेत.

‘पाकिस्तान मुर्दाबाद’... कुलभूषण प्रकरणी शिवसेनेचा संसदेत एल्गार

अमेरिकेत वसलेले भारतीय आणि बलूच नागरिकांनी पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर सोमवारी निदर्शनं करीत, पाकिस्तानच्या कृतीचा निषेध केला. यावेळी निदर्शनं करणाऱ्यांच्या हातात चप्पल चोर पाकिस्तानचे बॅनरदेखील होते. शिवया, यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

कुलभूषण यांच्या पत्नी आणि आईला पाककडून विधवेप्रमाणे वागणूक : स्वराज 

दरम्यान, कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांचा अपमान करण्याचं षडयंत्र पूर्वीच शिजलं होतं अशी माहिती आता समोर येत आहे. दहशतवादी हाफिज सईदचा खास सहकारी आणि लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आमीर हमजाने याबाबतचा धक्कादायक दावा केला आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने जाधव कुटुंबियांचा अपमान करायचं हे आधीच ठरवलं होतं, असं हमजाने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

आईवर भारतीय अधिकारी ओरडले, कुलभूषण जाधवांचा कथित व्हिडिओ

 

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: washington dc indian americans balochs protest outside pakistan embassy
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV