न्यायमूर्तींचा वाद मिटला, महाधिवक्त्यांचा दावा

सुप्रीम कोर्टातील वाद म्हणजे पेल्यातलं वादळ होतं अशी प्रतिक्रिया वेणुगोपाल यांनी दिली.

न्यायमूर्तींचा वाद मिटला, महाधिवक्त्यांचा दावा

नवी दिल्ली: चार न्यायामूर्ती आणि सरन्यायाधीश यांच्यातील वाद मिटला आणि त्यांनी ‘चाय पे चर्चा’ ही केली. असा दावा महाधिवक्ता के के वेणुगोपाल यांनी केलाय.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती जे चेलमेश्वर, कुरियन जोसेफ, रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांच्यात खटल्याच्या वाटपावरुन मतभेद झाले होते. त्यानंतर 12 जानेवारीला जाहीर पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांबद्दल नाराजी व्यक्त केली.

त्यानंतर आज कोर्टाचं काम सुरु झालं. त्यावेळी चारही न्यायाधीशांनी आपलं कामाकाज सुरु केलं.

सुप्रीम कोर्टातील वाद म्हणजे पेल्यातलं वादळ होतं अशी प्रतिक्रिया वेणुगोपाल यांनी दिली.

काय होता वाद?

चार न्यायमूर्तींनी इतिहासात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन, सुप्रीम कोर्टाचं कामकाज नीट चालत नसल्याचा गौप्यस्फोट केला.

"सुप्रीम कोर्टाचा गेल्या दोन महिन्यातील कारभार व्यथित करणारा आहे. काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट प्रशासन नीट काम करत नाही. याबाबत मुख्य न्यायमूर्तींसमोर प्रश्न मांडले, पण काहीच उपयोग झाला नाही", अशी हतबलता दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नाही तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मांडली.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेतली.

विशेष म्हणजे ज्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली ते सरन्यायाधीशांनंतरचे सर्वात सीनियर आहेत.

संबंधित बातम्या

सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: We met 15 SC judges and all have assured that issues have been resolved: BCI chairman
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV