भारतमाला प्रकल्प नेमका काय आहे?

या प्रकल्पाची औपचारिक घोषणा दळणवळण मंत्री नितीन गडकरी करतील.

By: | Last Updated: 24 Oct 2017 08:01 PM
भारतमाला प्रकल्प नेमका काय आहे?

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. भारत ही गेल्या तीन वर्षांपासून सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. मोठ्या बदलांचे नकारात्मक परिणाम हे भविष्यासाठी फायदेशीर आहेत, असा दावा जेटलींनी केला.

अरुण जेटली यांनी आकडेवारी सादर करुन विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यासोबतच केंद्र सरकारने भारतमाला या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचीही माहिती दिली. येत्या पाच वर्षात सरकार 7 लाख कोटी रुपये खर्च करुन 83 हजार किमीचे रस्ते बांधणार आहे.

काय आहे भारतमाला प्रकल्प?

  • या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात 34 हजार 800 किमीचे रस्ते बांधण्यात येतील.

  • या टप्प्यात सीमा आणि किनारपट्टीवरील रस्त्यांचा समावेश

  • या प्रकल्पामुळे आर्थिक विकास, रोजगार वाढण्यास मदत होईल.

  • 10 हजार किमी रस्ता बांधल्यामुळे 4 कोटी दिवसांचा रोजगार निर्माण होईल

  • या प्रकल्पाचा 70 टक्के खर्च सरकार करणार आहे. तर उर्वरित खर्च खासगी गुंतवणुकीतून मिळेल.

  • या प्रकल्पाची औपचारिक घोषणा दळणवळण मंत्री नितीन गडकरी करतील.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: bharatmala भारतमाला
First Published:
LiveTV