गुजरात, हिमाचलचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम?

एबीपी आणि सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये दोन्हीही राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव होताना दिसतोय.

गुजरात, हिमाचलचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम?

नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजप बहुमताने विजय मिळवत आहे. दोन्ही राज्यांचा अंतिम निकाल 18 डिसेंबरला येणार आहे. एबीपी आणि सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये दोन्हीही राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव होताना दिसतोय.

2019 च्या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम?

  • या राज्यांच्या निकालानंतर 2019 ला भाजप आणखी ताकदीने उभी राहिल

  • जीएसटी आणि नोटाबंदीनंतर मिळालेल्या विजयाने भाजप विरोधकांना घेरणार

  • भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान मोदी या जोडीचं नेतृत्त्व आणखी मजबूत होईल

  • पुढच्या वर्षात होणाऱ्या 8 राज्यांच्या निवडणुकांमध्ये गुजरात आणि हिमाचलच्या विजयाचा परिणाम दिसून येईल.


पुढच्या वर्षी भाजपशासित तीन राज्य राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आणि कर्नाटकसह चार राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजप गुजरात आणि हिमाचलच्या विजयाचा पुरेपूर वापर करेल. मे 2014 मध्ये मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते, तर जुलै 2014 मध्ये अमित शाह यांच्याकडे भाजपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर या जोडीने विजयाची मालिका कायम ठेवली आहे.

मोदी-शाह जोडीचा विजयरथ कायम राहणार?


या जोडीने 2014 साली पहिल्यांदाच हरियाणामध्ये भाजपचा झेंडा फडकावला. झारखंडमध्ये आणि महाराष्ट्रातही शिवसेनेच्या मदतीने भाजपने सत्ता स्थापन केली. जम्मू-काश्मीरमध्येही भाजप सर्वात मोठा दुसरा पक्ष ठरला. 2015 मध्ये दिल्ली आणि बिहारमध्ये या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला, मात्र भाजप सध्या बिहारमध्ये जेडीयूच्या मदतीने सत्तेत आहे.

भाजपला 2016 मध्ये तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मात्र आसाममध्ये सत्ता मिळवत भाजपने उत्तर पूर्वेकडे पाऊल टाकलं. 2017 मध्ये उत्तर प्रदेशात सर्वात मोठा विजय मिळवला. उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यातही सत्ता स्थापन केली, तर पंजाबमध्ये पराभव पत्करावा लागला. एक्झिट पोलच्या आकड्यांनी आता या जोडीच्या नेतृत्त्वाला आणखी मजबूत केलं आहे.

गुजरातची निवडणूक ही एकतर्फी होईल, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. मात्र एक्झिट पोलचे आकडे वेगळंच काही सांगत आहेत. हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता जाताना दिसत आहे, तर गुजरातमध्ये 2012 च्या तुलनेत काँग्रेसच्या जागांमध्ये किरकोळ वाढ होत आहे.

संबंधित बातम्या :

गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल एकाच ठिकाणी


गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल एकाच ठिकाणी


गुजरातमध्ये मोदीच, हिमाचलमध्येही मोदी!


 

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: what will be impact of Gujarat and Himachal pradesh result on 2019 loksabha election
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV