स्त्री-पुरुष आर्थिक समानतेच्या जागतिक क्रमवारीत भारताची 21 अंकांनी घसरण

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमनं स्त्री-पुरुष समानतेबाबतचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे.या सर्व्हेच्या निष्कर्षानुसार, स्त्री-पुरुष समानता निर्देशांकात भारत जगात आता 108 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर भारताच्या क्रमवारीत तब्बल 21 अंकांनी घसरण झाली आहे.

स्त्री-पुरुष आर्थिक समानतेच्या जागतिक क्रमवारीत भारताची 21 अंकांनी घसरण

मुंबई : आपल्या देशात आता स्त्री-पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात प्रगती करताना आपला ठसा उमटवताना दिसतात, असं आपण खरंच अभिमानानं सांगू शकतो का? पुरुषप्रधान संस्कृतीवर मात करुन स्त्रियांनी आपल्यातील धमक दाखवून देण्यासाठी मेहनत घेतली खरी. पण समाज म्हणून स्त्रियांना अजूनही समानतेची वागणूक मिळत नसल्याचं पुन्हा समोर येत आहे.

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमनं स्त्री-पुरुष समानतेबाबतचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालासाठी, पुरुषांच्या प्रमाणात स्त्रियांना कामाच्या ठिकाणी मिळणारं वेतन, अर्थव्यवस्थेतीतल महिलांचं योगदान, राजकीय प्रतिनिधित्व, आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांना अनुसरून सर्व्हे केला गेला. या सर्व्हेच्या निष्कर्षानुसार, स्त्री-पुरुष समानता निर्देशांकात भारत जगात आता 108 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर भारताच्या क्रमवारीत तब्बल 21 अंकांनी घसरण झाली आहे.

महिलांना आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मिळणाऱ्या संधीमध्ये भारत 139 व्या तर महिलांचं आरोग्य आणि सोयीसुविधांमध्ये भारत 141 व्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे स्त्री-पुरुष समानतेमधील ही दरी भरुन निघण्यासाठी अजून 100 वर्ष लागणार असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. याआधी हा कालावधी 83 वर्ष इतका होता.

चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री आज जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्व सिद्ध करत असल्याची उदाहरण आपण देत असलो, तरी दुसऱ्या बाजूला देशात महिलांवर होणारे अत्याचार, त्यांचं वाढतं अनारोग्य आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी दुय्यम वागणूक हे वास्तव नक्कीच एक समाज म्हणून विचार करायला भाग पाडणारं आहे.

त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून वावरणारी भारतीय स्त्री आजही स्त्री पुरुष समानतेत पिछाडीवरच दिसते.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: world economic forums report on mens and womens equality on economical condition
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV