दिल्लीत 800 किलो तर नागपुरात 500 किलो खिचडी शिजली

संजीव कपूर यांच्यासोबत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसीमरत कौर, योगगुरु रामदेव बाबा यांची यावेळी उपस्थिती होती.

दिल्लीत 800 किलो तर नागपुरात 500 किलो खिचडी शिजली

नवी दिल्ली: दिल्लीत सुरु असलेल्या वर्ल्ड फूड इंडिया फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी 800 किलो खिचडी तयार केली. अनेक पोषक धान्य आणि डाळींचा वापर करुन ही खिचडी बनवली

संजीव कपूर यांच्यासोबत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसीमरत कौर, योगगुरु रामदेव बाबा यांची यावेळी उपस्थिती होती.

ही खिचडी बनवण्यासाठी 1 हजार लीटर क्षमतेची कढई वापण्यात आली. ही खिचडी बनवण्यासाठी संजीव कपूर यांना 50 लोकांनी मदत केली. संजीव कपूर यांच्या प्रयत्नाची गिनीज बुकमध्ये नोंद होण्याचीही शक्यता आहे.

नागपूरमध्येही 500 किलो खिचडी

इकडे नागपूरमध्येही आंतरराष्ट्रीय खाद्यदिनानिमित्त विष्णूजी की रसोई आणि मैत्री परिवार संस्थेद्वारे 500 किलो खिचडी तयार करण्यात आली. सकाळपासून इथं खिचडी बनवण्याचं काम सुरु झालं. यासाठी मोठा मंडप घालण्यात आला आहे.

शेफ विष्णूजी सकाळापासून ही खिचडी बनवण्यासाठी मेहनत घेत आहेत. नागपूरकरांना ही खिचडी मोफत दिली जाणार आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून या उपक्रमाला सुरुवात झाली.भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: World Food India 2017: New Delhi & Nagpur Khichdi prepared by chef sanjeev kapoor & Vishnu Manohar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV