भारतासह जगभरात ख्रिसमसचा उत्साह, चर्चमध्ये गर्दी

आनंद आणि उत्साहाचं प्रतिक असलेला ख्रिसमस संपूर्ण ख्रिश्चन समाजाचा सर्वात मोठा सण आहे. 25 डिसेंबर रोजी प्रभू येशूंच्या जन्मदिवस म्हणून हा सण साजरा केला जातो.

भारतासह जगभरात ख्रिसमसचा उत्साह, चर्चमध्ये गर्दी

मुंबई : भारतासह जगभरात ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरातील विविध चर्चमध्ये येशू जन्माचा उत्सव साजरा केला जात असून चर्चना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

आनंद आणि उत्साहाचं प्रतिक असलेला ख्रिसमस संपूर्ण ख्रिश्चन समाजाचा सर्वात मोठा सण आहे. 25 डिसेंबर रोजी प्रभू येशूंच्या जन्मदिवस म्हणून हा सण साजरा केला जातो.

christmas 1

मुंबई, वसई तसंच गोव्यात ख्रिस्ती बांधव प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमले होते. अत्यंत धार्मिक पद्धतीने मिसा झाला. चर्चमध्ये प्रभू येशूच्या आगमनाचं गीतही गायलं. यानंतर चर्चच्या फादरनी सर्वांना आशीर्वाद देवून, ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

दुसरीकडे मुंबईतील जुहू चौपाटीवर सॅण्ड आर्टिस्ट लक्ष्मी गौड यांनी सलग 12 तास मेहनत करुन 12 फुटांचा सांताक्लोज बनवला. यासोबत स्वच्छता राखा असा संदेशही त्यांनी दिला.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: World including India celebrates Christmas today
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV