ना पिनची, ना कार्डची गरज, येस बँक नवं एटीएम आणणार

येस बँकेने एका नव्या तंत्रासाठी जो करार केला आहे, त्यामुळे हे शक्य होणार आहे.

ना पिनची, ना कार्डची गरज, येस बँक नवं एटीएम आणणार

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील येस बँक असं एटीएम आणणार आहे, जे वापरण्यासाठी ना पिनची गरज असेल, ना कार्डची. येस बँकेने एका नव्या तंत्रासाठी जो करार केला आहे, त्यामुळे हे शक्य होणार आहे.

येस बँकेचा नियरबार टेकसोबत करार

येस बँकेने फिनटेक क्षेत्रातील कंपनी नियरबाय टेकसोबत करार केला आहे. कार्ड आणि पिनची गरज नसणारं एटीएम ही कंपनी देणार आहे. ग्राहक रिटेलर्सकडेच पैसे जमा करु शकतील आणि तिथूनच पैसे काढूही शकतील. नियरबायने ही सेवा सुरु करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी मिळूनही काम केलं आहे.

हे एटीएम काम कसं करणार?

  • पे नियरबाय अॅपचा वापर स्मार्टफोनवरही करता येईल. यामुळे काही रिटेलर्स ग्राहकांसाठी आधार-एटीएम आणि आधार बँक शाखेच्या रुपात काम करु शकतील. यातूनच कॅश जमा करणं किंवा काढण्याची सुविधा मिळेल, असं येस बँकेने म्हटलं आहे.

  • ग्राहक आधार नंबर आणि फिंगरप्रिंटचा वापर करुन पैसे काढू शकतील किंवा इतर व्यवहार करता येतील.

  • पे नियरबाय आधार एटीएम येस बँक आणि बिझनेस करस्पाँडंट यांच्या माध्यमातून उपलब्ध होईल. याचे जवळपास 40 हजार टच पॉईंट असतील.


नियरबायने आधार सेवा आणि त्याबाबतच्या जागृतीसाठी रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाशी करार केला आहे. व्यवहारांसाठी अधिकाधिक सेवा प्रदान करणं हा आमचा उद्देश असल्याचं नियरबाय टेकचे संस्थापक आनंदकुमार बजाज यांनी म्हटलं आहे.

या सेवेमुळे लेस कॅश अर्थव्यवस्थेचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल, असं येस बँकेचे मुख्य डिजिटल अधिकारी रितेश पई यांनी म्हटलं आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Yes bank to provide without pin and without card ATM
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV