योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्याच दिवशी पाच घोषणा

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Monday, 20 March 2017 11:38 AM
योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्याच दिवशी पाच घोषणा

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच योगी आदित्यनाथ यांनी पाच गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं आहे. आदित्यनाथ यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना 15 दिवसात संपत्तीचा तपशील देण्यास सांगितलं आहे. शिवाय भाजपच्या जाहीरनाम्यातील गोष्टी अजेंड्यावर असतील, असंही स्पष्ट केलं.

‘’संपत्तीचा तपशील सार्वजनिक करा’’

योगी आदित्यनाथ यांची शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रिमंडळासोबत बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. सर्व मंत्र्यांना आपली संपत्ती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले असल्याचं आदित्यनाथ यांनी सांगितलं.

तरुणांना रोजगार

उत्तर प्रदेशातील तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहिल, असंही आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं. भाजपच्या जाहीरनाम्यातील घोषणा पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं जाईल, असंही ते म्हणाले.

‘’वादग्रस्त वक्तव्य करु नका’’

सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येणारे योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्य करणं टाळावं, असाही सल्ला दिला आहे.

दोन प्रवक्त्यांची नियुक्ती

आदित्यनाथ यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांची प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीकांत शर्मा आणि सिद्धार्थ नाथ सिंह हे भाजपचे प्रवक्त म्हणून काम पाहतील.

ग्रामीण भागाला प्राधान्य

उत्तर प्रदेशातील शेती आणि शेतकऱ्यांचा विकास करणं सरकारची प्राथमिकता असेल, असं आदित्यनाथ यांनी सांगितलं. शिवाय ग्रामीण भागाच्या विकासासाठी योजना बनवल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

शपथविधीपूर्वी योगी आदित्यनाथ यांच्यावर विरोधकांची सडकून टीका

योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील 46 चेहरे कोण?

First Published: Monday, 20 March 2017 11:38 AM

Related Stories

अँटी रोमियो पथकाच्या नावावर तरुण-तरुणींना त्रास, तीन पोलीस निलंबित
अँटी रोमियो पथकाच्या नावावर...

लखनऊ : उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या

नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ, पंतप्रधान मोदींचा दावा
नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटमध्ये...

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली असून

चिप असलेल्या ई-पासपोर्टला मंजुरी
चिप असलेल्या ई-पासपोर्टला मंजुरी

नवी दिल्ली : ई-पासपोर्ट बनवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक काँटॅक्टलेस

ट्रेनमध्ये आता ‘विकल्प’, वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना नो टेन्शन !
ट्रेनमध्ये आता ‘विकल्प’, वेटिंग...

नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान रेल्वे तिकीट कन्फर्म

लवकरच वाहन परवान्यासाठीही आधार कार्ड सक्तीचं
लवकरच वाहन परवान्यासाठीही आधार...

नवी दिल्ली : बनावट वाहन परवाना तयार करण्याच्या प्रकाराला आळा

अरुण जेटलींची मानहानी केल्याप्रकरणी केजरीवालांवर आरोप निश्चित
अरुण जेटलींची मानहानी केल्याप्रकरणी...

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांची मानहानी केल्याप्रकरणी

आयकरच्या कारवाईत 49 हजार 247 कोटींची काळी संपत्ती उघड
आयकरच्या कारवाईत 49 हजार 247 कोटींची...

नवी दिल्ली : गेल्या चार वर्षात आयकर विभागानं केलेल्या कारवाईत तब्बल

गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात हक्कभंग आणणार
गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या...

नवी दिल्ली : विमानसेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात शिवसेना

बांगलादेश-पाकिस्तानच्या सीमा सील करणार : राजनाथ सिंह
बांगलादेश-पाकिस्तानच्या सीमा सील...

ग्वाल्हेर : बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमा लवकरात लवकर सील

देवेंद्र फडणवीसांच्या पाच आयडिया योगी आदित्यनाथांनी मागवल्या
देवेंद्र फडणवीसांच्या पाच आयडिया...

मुंबई : देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या