अलीगढच्या इस्लामिक स्कूलमधील पाठ्यपुस्तकात झाकिर नाईक ‘हिरो’

वादग्रस्त धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईकचा अलीगढच्या एका इस्लामिक शाळेतील पाठ्यपुस्तकात ‘हिरो’ म्हणून उल्लेख करण्यात आल्याने, खळबळ उडाली आहे. अलीगढच्या इस्लामिक शाळेतील ‘इल्म-उन-नफे’ या पुस्तकातून झाकीरला ‘महान व्यक्ती’ म्हणून सांगण्यात आलं आहे.

अलीगढच्या इस्लामिक स्कूलमधील पाठ्यपुस्तकात झाकिर नाईक ‘हिरो’

नवी दिल्ली : वादग्रस्त धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईकचा अलीगढच्या एका इस्लामिक शाळेतील पाठ्यपुस्तकात ‘हिरो’ म्हणून उल्लेख करण्यात आल्याने, खळबळ उडाली आहे. अलीगढच्या इस्लामिक शाळेतील ‘इल्म-उन-नफे’ या पुस्तकातून झाकीरला ‘महान व्यक्ती’ म्हणून सांगण्यात आलं आहे.

अलीगढच्या डॉ. कोनेन कॉसर यांनी या पुस्तकाचं संकलन केलं असून, पुस्तकातील पान क्रमांक 20 वर झाकीर नाईकला महान व्यक्ती असल्याचं सांगण्यात आला आहे. शिवाय या पुस्तकाच्या अध्ययानातून मुलांचं ज्ञान वाढतं, असा दावाही करण्यात आला आहे.

दरम्यान, हे प्रकरण समोर येताच, अलिगढच्या प्राथमिक शिक्षणअधिकाऱ्यांनी शाळेला नोटीस बजावली असून, यात शाळेची मान्यता रद्द करण्याचे संकेत दिले आहेत.

या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना, "पुस्तकाची जेव्हा छपाई करण्यात आली, त्यावेळी झाकीर नाईकविरोधात कोणताही गुन्हा दाखल नव्हता. पण आता नवीन पुस्तक लवकरच छापून मिळेल, त्यानंतर त्याचे वाटप विद्यार्थ्यांना केलं जाईल," असं शाळेनं स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे या प्रकरणी शाळेला नोटीस बजावण्यात आल्याचं अलीगढच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच, लवकरच शाळेची मान्यताही रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असंही यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

कोण आहे झाकीर नाईक?

बांगलादेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी हा झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावित होता. त्यामुळे बांगलादेशात झाकीर नाईकच्या पीस टीव्हीवर बंदी घालण्यात आली. याशिवाय भारतातही हा चॅनेल बंद करण्यात आला आहे. तरुणांची माथी भडकावून, अशांतता निर्माण करत असल्याचा आरोप झाकीरवर आहे.

संबंधित बातम्या

तरुणांची माथी भडकवणाऱ्या झाकीर नाईकविरोधात आरोपपत्र दाखल

'झाकीर नाईक इस्लामला बदनाम करतो आहे'

मी शांतीदूत, मात्र युद्धात आत्मघाती हल्ले योग्य : झाकीर नाईक

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: zakir naik is projected as islamic hero in aligarh school
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV