दिल्लीची पुण्यावर सात धावांनी मात

By: | Last Updated: > Saturday, 13 May 2017 12:02 AM
delhi-daredevils-won-match-by-7-runs

 

मुंबई : मनोज तिवारीनं प्रयत्नांची शर्थ करुनही पुण्याला दिल्लीकडून सात धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात दिल्लीनं पुण्याला विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पुण्याला वीस षटकांत सात बाद 161 धावांचीच मजल मारता आली.

त्या लक्ष्याचा पाठलाग करताना मनोज तिवारीनं 45 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 64 धावांची खेळी केली. स्टीव्ह स्मिथनं 38 आणि बेन स्टोक्सनं 33 धावांची खेळी करून त्याला छान साथ दिली.

पण झहीर खान आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी दोन विकेट्स काढून पुण्याला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याआधी, या सामन्यात सलामीच्या करुण नायरच्या 64 धावांच्या जोरावर दिल्लीनं 20 षटकांत आठ बाद168 धावांची मजल मारली होती.

करुण नायरनं 45 चेंडूंत नऊ चौकारांसह 64 धावांची खेळी उभारली. ऋषभ पंतच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 74 धावांची आणि मार्लन सॅम्युअल्सच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी रचली. पंतनं 36 धावांची, तर सॅम्युअल्सनं 27 धावांची खेळी केली. दिल्लीनं पुण्याला हरवून आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 13 सामन्यांमधला सहा विजय साजरा केला.

दिल्लीच्या खात्यात आता 12 गुण झाले असले तरी त्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात आलं आहे. पुण्याचा हा 13 सामन्यांमधला पाचवा पराभव ठरला. पुण्यानं आठ विजयांसह 16 गुणांची कमाई केली असून, प्ले ऑफच्या शर्यतीत पुणे तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

IPL News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:delhi-daredevils-won-match-by-7-runs
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचं 'नंबर वन' स्थानावर निर्विवाद वर्चस्व
गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचं 'नंबर वन' स्थानावर निर्विवाद वर्चस्व

मुंबई : मुंबई इंडियन्सनं ईडन गार्डन्सवरच्या सामन्यात यजमान

पंजाबच्या कोलकात्यावरच्या विजयानं प्ले ऑफच्या शर्यतीत चुरशीचा नवा रंग
पंजाबच्या कोलकात्यावरच्या विजयानं प्ले ऑफच्या शर्यतीत चुरशीचा...

  मुंबई : ग्लेन मॅक्सवेलच्या पंजाबनं बलाढ्य कोलकात्यावर 14 धावांनी

हैदराबादचा मुंबई इंडियन्सवर सात विकेट्सनी दणदणीत विजय
हैदराबादचा मुंबई इंडियन्सवर सात विकेट्सनी दणदणीत विजय

  मुंबई : शिखर धवन आणि मोझेस हेन्रिक्सनं दुसऱ्या विकेटसाठी

पॅन कार्डसाठी आधार कार्ड गरजेचं आहे का? : सुप्रीम कोर्ट
पॅन कार्डसाठी आधार कार्ड गरजेचं आहे का? : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : नवीन पॅन कार्डसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आल्यानं

डिव्हिलियर्ससह अनेक क्रिकेटपटू IPL मध्येच सोडणार!
डिव्हिलियर्ससह अनेक क्रिकेटपटू IPL मध्येच सोडणार!

मुंबई : बीसीसीआयने आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर

आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक
आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : बीसीसीआयने आयपीएल 2017 चं टाईमटेबल जाहीर केलं आहे. यंदा ही

तीन वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल जेतेपद, युवीचा अनोखा विक्रम
तीन वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल जेतेपद, युवीचा अनोखा...

बंगळुरु : सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर

अमेरिकेत विराट विरुद्ध धोनी जुगलबंदी?
अमेरिकेत विराट विरुद्ध धोनी जुगलबंदी?

मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली विरुद्ध कॅप्टनकूल

IPL 2016 : बंगळुरु आणि हैदराबाद संघात अंतिम सामना
IPL 2016 : बंगळुरु आणि हैदराबाद संघात अंतिम सामना

नवी दिल्ली : आयपीएलच्या नवव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी रॉयल

VIDEO: मनदीप - विराटने गेलला नाचवलं
VIDEO: मनदीप - विराटने गेलला नाचवलं

मुंबई: विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स टीम मैदानावर जितकी जीव ओतून