गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचं 'नंबर वन' स्थानावर निर्विवाद वर्चस्व

By: | Last Updated: > Sunday, 14 May 2017 7:33 AM
mumbai indians no one in ipl-10 tally

मुंबई : मुंबई इंडियन्सनं ईडन गार्डन्सवरच्या सामन्यात यजमान कोलकात्याचा नऊ धावांनी पराभव करून आयपीएलच्या साखळीत नंबर वनचा निर्विवाद मान मिळवला. मुंबईकडून झालेल्या पराभवामुळं कोलकात्याची मात्र साफ निराशा झाली.

पुणे आणि पंजाब संघांमधल्या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकात्याचा क्रमांक तिसरा की, चौथा हे स्पष्ट होईल. दरम्यान, ईडन गार्डन्सवरच्या सामन्यात मुंबईनं कोलकात्याला विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं होतं. पण मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकात्याला 20 षटकांत आठ बाद 168 धावांत रोखलं.

मुंबईकडून टीम साऊदी, विनयकुमार आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल जॉन्सन आणि कर्ण शर्मानं एकेक विकेट काढून त्यांना छान साथ दिली. त्याआधी, या सामन्यात सौरभ तिवारी आणि अंबाती रायुडूच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईनं 20 षटकांत पाच बाद 173 धावांची मजल मारली होती.

सौरभ तिवारीनं 43 चेंडूंमध्ये नऊ चौकारांसह 52 धावांची, तर अंबाती रायुडूनं 37 चेंडूंमध्येच 6 चौकार आणि 3 षटकारांसह 63 धावांची खेळी उभारली. रोहित शर्मानं 21 चेंडूंत 27 धावांची खेळी केली. 

IPL News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:mumbai indians no one in ipl-10 tally
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

दिल्लीची पुण्यावर सात धावांनी मात
दिल्लीची पुण्यावर सात धावांनी मात

  मुंबई : मनोज तिवारीनं प्रयत्नांची शर्थ करुनही पुण्याला

पंजाबच्या कोलकात्यावरच्या विजयानं प्ले ऑफच्या शर्यतीत चुरशीचा नवा रंग
पंजाबच्या कोलकात्यावरच्या विजयानं प्ले ऑफच्या शर्यतीत चुरशीचा...

  मुंबई : ग्लेन मॅक्सवेलच्या पंजाबनं बलाढ्य कोलकात्यावर 14 धावांनी

हैदराबादचा मुंबई इंडियन्सवर सात विकेट्सनी दणदणीत विजय
हैदराबादचा मुंबई इंडियन्सवर सात विकेट्सनी दणदणीत विजय

  मुंबई : शिखर धवन आणि मोझेस हेन्रिक्सनं दुसऱ्या विकेटसाठी

पॅन कार्डसाठी आधार कार्ड गरजेचं आहे का? : सुप्रीम कोर्ट
पॅन कार्डसाठी आधार कार्ड गरजेचं आहे का? : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : नवीन पॅन कार्डसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आल्यानं

डिव्हिलियर्ससह अनेक क्रिकेटपटू IPL मध्येच सोडणार!
डिव्हिलियर्ससह अनेक क्रिकेटपटू IPL मध्येच सोडणार!

मुंबई : बीसीसीआयने आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर

आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक
आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : बीसीसीआयने आयपीएल 2017 चं टाईमटेबल जाहीर केलं आहे. यंदा ही

तीन वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल जेतेपद, युवीचा अनोखा विक्रम
तीन वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल जेतेपद, युवीचा अनोखा...

बंगळुरु : सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर

अमेरिकेत विराट विरुद्ध धोनी जुगलबंदी?
अमेरिकेत विराट विरुद्ध धोनी जुगलबंदी?

मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली विरुद्ध कॅप्टनकूल

IPL 2016 : बंगळुरु आणि हैदराबाद संघात अंतिम सामना
IPL 2016 : बंगळुरु आणि हैदराबाद संघात अंतिम सामना

नवी दिल्ली : आयपीएलच्या नवव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी रॉयल

VIDEO: मनदीप - विराटने गेलला नाचवलं
VIDEO: मनदीप - विराटने गेलला नाचवलं

मुंबई: विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स टीम मैदानावर जितकी जीव ओतून