पंजाबच्या कोलकात्यावरच्या विजयानं प्ले ऑफच्या शर्यतीत चुरशीचा नवा रंग

By: | Last Updated: > Wednesday, 10 May 2017 12:10 AM
Punjab wins kolkata live update

 

मुंबई : ग्लेन मॅक्सवेलच्या पंजाबनं बलाढ्य कोलकात्यावर 14 धावांनी मात करून, आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीत नवा रंग भरला आहे. कोलकात्याचा तेरा सामन्यांमधला हा पाचवा पराभव ठरला आहे. त्यामुळं अव्वल स्थानावरच्या मुंबईला गाठण्याचा कोलकात्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

त्याच वेळी पंजाबनं बारा सामन्यांमध्ये सहावा विजय मिळवून आपली गुणकमाई बारावर नेली. आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाब सध्या पाचव्या स्थानावर असलं तरी त्यांना चौथ्या स्थानावरच्या हैदराबादला ओव्हरटेक करण्याची संधी आहे.

दरम्यान, मोहालीतल्या सामन्यात ख्रिस लिनचा अपवाद वगळता कोलकात्याच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. पंजाबनं दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा कोलकात्याचा प्रयत्न 14 धावांनी अयशस्वी ठरला आहे.

पंजाबचा लेग स्पिनर राहुल तेवातियानं 18 धावांत दोन, तर मध्यमगती गोलंदाज मोहित शर्मानं 24 धावांत दोन विकेट्स काढून कोलकात्याला 20 षटकांत सहा बाद 153 धावांत रोखलं. त्यापैकी 84 धावा या एकट्या ख्रिस लिनच्या आहेत.

त्याआधी, रिद्धिमान साहा आणि ग्लेन मॅक्सवेलनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 71 धावांच्या भागिदारीच्या जोरावर पंजाबनं 20 षटकांत सहा बाद 167 धावांची मजल मारली होती. साहानं 33 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह 38 धावांची खेळी केली. ग्लेन मॅक्सवेलनं 25 चेंडूंतच एक चौकार आणि चार षटकारांसह 44 धावांची खेळी उभारली.

IPL News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Punjab wins kolkata live update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचं 'नंबर वन' स्थानावर निर्विवाद वर्चस्व
गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचं 'नंबर वन' स्थानावर निर्विवाद वर्चस्व

मुंबई : मुंबई इंडियन्सनं ईडन गार्डन्सवरच्या सामन्यात यजमान

दिल्लीची पुण्यावर सात धावांनी मात
दिल्लीची पुण्यावर सात धावांनी मात

  मुंबई : मनोज तिवारीनं प्रयत्नांची शर्थ करुनही पुण्याला

हैदराबादचा मुंबई इंडियन्सवर सात विकेट्सनी दणदणीत विजय
हैदराबादचा मुंबई इंडियन्सवर सात विकेट्सनी दणदणीत विजय

  मुंबई : शिखर धवन आणि मोझेस हेन्रिक्सनं दुसऱ्या विकेटसाठी

पॅन कार्डसाठी आधार कार्ड गरजेचं आहे का? : सुप्रीम कोर्ट
पॅन कार्डसाठी आधार कार्ड गरजेचं आहे का? : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : नवीन पॅन कार्डसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आल्यानं

डिव्हिलियर्ससह अनेक क्रिकेटपटू IPL मध्येच सोडणार!
डिव्हिलियर्ससह अनेक क्रिकेटपटू IPL मध्येच सोडणार!

मुंबई : बीसीसीआयने आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर

आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक
आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : बीसीसीआयने आयपीएल 2017 चं टाईमटेबल जाहीर केलं आहे. यंदा ही

तीन वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल जेतेपद, युवीचा अनोखा विक्रम
तीन वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल जेतेपद, युवीचा अनोखा...

बंगळुरु : सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर

अमेरिकेत विराट विरुद्ध धोनी जुगलबंदी?
अमेरिकेत विराट विरुद्ध धोनी जुगलबंदी?

मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली विरुद्ध कॅप्टनकूल

IPL 2016 : बंगळुरु आणि हैदराबाद संघात अंतिम सामना
IPL 2016 : बंगळुरु आणि हैदराबाद संघात अंतिम सामना

नवी दिल्ली : आयपीएलच्या नवव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी रॉयल

VIDEO: मनदीप - विराटने गेलला नाचवलं
VIDEO: मनदीप - विराटने गेलला नाचवलं

मुंबई: विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स टीम मैदानावर जितकी जीव ओतून